ड्यूनेडिन 18 मार्च- न्युझीलंडमधील क्रामस्टचर्च येथील दोन मशिदींमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम सिनेमावरही झालेला दिसला. या हल्ल्यानंतर चित्रपटगृहामधून देव पटेलचा मुंबई हॉटेल सिनेमा हटवण्यात आला. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर फार मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यावर देव पटेलसोबत ऑस्कर नामांकन मिळालेला अभिनेता आरमी हॅमर आणि अनुपम खेर यांनीही काम केलं आहे.
न्युझीलंड हॅराल्डने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फिल्म डिस्ट्रीब्यूशनने पत्रक जारी करत न्युझीलंडमधील सर्व चित्रपटगृहातून मुंबई हॉटेल सिनेमा हटवण्याचा तातडीने निर्णय घेतला. या पत्रकात लिहिले की, स्थानिक एग्झिबिशन पार्टनरसोबत चर्चा केल्यानंतर हा सिनेमा चित्रपटगृहातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण न्युझीलंड मशिदीवर झालेल्या हल्ल्यामुळे दुःखात आहे.
मुंबई हॉटेल सिनेमाचं दिग्दर्शन अँथोनी मारस यांनी केलं आहे. या सिनेमात मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील घटनाक्रमला मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात १६० हून अधिक लोक मारले गेले तर ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
१५ मार्चला न्युझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या दोन मशिदींवर दहशतवादी हल्ल् करण्यात आला. यात सहा भारतीयांचा मृत्यू झाला तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी चार गुजरातचे तर दोन हैदराबादचे होते. तर एक जखमी झालेला हैदराबादचा आहे. या दहशतवादी हल्ल्यात बांगलादेशचा क्रिकेट संघ थोडक्यात बचावला. हल्ल्यावेळी बांगलादेशचा संपूर्ण संघ मशिदीच्या जवळच थांबला होता. देव पटेलचा मुंबई हॉटेल हा सिनेमा भारतात २९ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे.
VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी