म्हणे माल्ल्या 'Bigg Boss', फोटोवरून हा क्रिकेटपटू झाला ट्रोल

विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्याला चांगलंच ट्रोल केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 12:16 PM IST

म्हणे माल्ल्या 'Bigg Boss', फोटोवरून हा क्रिकेटपटू झाला ट्रोल

लंडन, 14  जुलै : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ला 9000 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडकाबाज खेळाडू ख्रिस गेल याने विजय मल्याची भेट घेतली. विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्याला चांगलंच ट्रोल केलं.

विजय मल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला पुन्हा ट्वीट करत खास मेसेज लिहिला आहे. यामध्ये तो म्हणतोय की, 'गेल्या वर्षभरापासून मी बँकेला सर्व पैसे द्यायला तयार आहे. पण बँक पैसे का घेत नाही, हे त्यांनाच विचारा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण आहे?.'

Loading...

इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषकाचा थरार सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेत आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर युनिव्हर्स बॉसने विजय मल्याची भेट घेतली. या भेटीनंतर गेलने ट्विटरवर दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने काही ओळीही लिहिल्या आहेत. तो म्हणतो की, 'बिग बॉसला भेटल्याचा आनंद आहे.' गेलने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे.

विजय मल्यानेही गेलच्या या फोटोला रिप्लाय दिला आहे. तो म्हणतो की, ' माझा मित्र आणि युनिव्हर्स बॉसला भेटून आनंद झाला आहे.' विजय मल्या इतक्यावरच थांबला नाही. त्यानं इथंही आपण चोर नाही आणि भारतील बँकाला फसवूण पळालो नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो, 'मला काहीजण चोर म्हणतात. पण त्यांनी आपल्या बँकाना विचारावे, गेल्या वर्षभरापासून मी सर्व पैसे द्यायला तयार आहे. त्यांना वारंवार तशी विनंतीही केली. मात्र, बँक पैसे का घेत नाही. त्यानंतरच मला चोर म्हणायचा निर्णय घ्यावा.'

विश्वचषकात आव्हान संपल्यानंतर विंडिजचे काही खेळाडू अद्याप इंग्लंडमध्येच आहेत. यादरम्यान, फॉर्मुला वन पहायला गेलेल्या गेलची आणि विजय मल्याची भेट झाली. या भेटीचा फोटो गेलने ट्विटरवर पोस्ट केला. गेलने फोटो पोस्ट केल्यानंतर भारतीयांनी त्याला ट्रोल केलं. विजय मल्याला कुरिअरने भारतात पाठवण्याचा सल्लाही दिला.

VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...