बनारस विद्यापीठावर मराठी झेंडा !, कुलगुरूपदी बी. ए. चोपडे यांची नियुक्ती

देशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक बनारस हिंदू विद्यापीठावर मराठी झेंडा फडकलाय.. बीएचयूत्या कुलगुरुपदी जॉ. बी ए चोपडे यांची नियुक्ती झालीये.. डॉ. चोपडे सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

Chandrakant Funde | Updated On: Feb 3, 2018 12:24 PM IST

बनारस विद्यापीठावर मराठी झेंडा !, कुलगुरूपदी बी. ए. चोपडे यांची नियुक्ती

03 फेब्रुवारी, औरंगाबाद : देशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक बनारस हिंदू विद्यापीठावर मराठी झेंडा फडकलाय.. बीएचयूत्या कुलगुरुपदी जॉ. बी ए चोपडे यांची नियुक्ती झालीये.. डॉ. चोपडे सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना ही संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठात तरुणींच्या छेडछाडीचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. बीएचयूचे तत्कालीन कुलगुरु प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठवण्यात आल्यामुळे ते पद तूर्तास रिक्त आहे. राष्ट्रपतींनी हे पद भरण्याची प्रक्रिया सुरु केली होती. नियुक्तीचं पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन चोपडे वाराणसीला रवाना होणार आहेत.

डॉ. बी. ए. चोपडे या परिचय

- पोस्ट डॉक्टोरल रिसर्च - इलिनॉई विद्यापीठ, अमेरिका

- डॉक्टरेट - नॉटिंगहॅम विद्यापीठ, ब्रिटन

- एमएससी (मायक्रोबायोलॉजी) - पुणे विद्यापीठ

- शिक्षण, संशोधनाचा 37 वर्षांचा अनुभव

- 3 पुस्तकांचे लेखक, एका पुस्तकाचे सह-लेखक

- देश-विदेशात 9 पेटंट्स नावावर

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close