नवी दिल्ली 31 जानेवारी : चीनमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलीय. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या साडेतीन हजारांच्या वर गेली असून 100 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. चीनमधलं वुहान हे शहर कोरोना व्हायरसने सर्वात जास्त ग्रस्त आहे. या शहरात 400 भारतीय अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाचं खास विमान दिल्लीहून वुहानला रवाना झालंय. अशाचं प्रकारचं एक विमान मुंबईवरूनही वुहानला जाणार आहे. वुहानमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या ते घाबरलेल्या अवस्थेत असून त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार खास मिशन राबत आहे.
या विद्यार्थ्यांना भारतात आणल्यानंतर त्यांची तपासणी होणार आहे.
त्यात जर काहींना कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिलीय. चीन सरकारने वुहान हे शहर सार्वजनिक वाहतुकीपासून बंद केलं आहे. शहराचे सर्व रस्ते येण्या-जाण्यासाठी बंद केले असून नागरिकांना या शहरात जाण्यापासून आणि शहरात प्रवेश करण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय.
मंत्र्यांमध्ये भांडणं असल्याचं सांगणं म्हणजे मुद्दाम केलेला चावटपणा - अजित पवार
वुहानपासून सुरू झालेला हा संसर्ग संपूर्ण चीनमध्ये पसरला आहे आणि अमेरिकेसह जवळपास डझनभर देशात संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. अमेरिका, फ्रान्स आणि रशिया यांनी नागरिकांना वुहानमधून बाहेर काढण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर, इतर देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी संभाव्य संसर्ग वेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
Air India Spokesperson: Air India special flight will depart today from Delhi for Wuhan (China) for the evacuation of Indians. #Coronavirus pic.twitter.com/QyoGwQWYvP
— ANI (@ANI) January 31, 2020
महाराष्ट्रातील शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल 21 लाखांची लूट
ध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, "चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे पण त्याचवेळी कोरोना विषाणूविरूद्ध चीन ही लढाई जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला." सार्स सारख्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांना गती देऊन चीनने येत्या 15 दिवसांत वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्याची घोषणा रविवारी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus