पहिल्यांदा चीनमध्ये कसा पसरला कोरोना? धक्कादायक माहिती आली समोर

पहिल्यांदा चीनमध्ये कसा पसरला कोरोना? धक्कादायक माहिती आली समोर

वुहान लॅबमध्ये वटवाघळातून आलेल्या RaTG13 व्हायरसचे विषाणू ठेवण्यात आले होते.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै: वुहानमधून पसरलेल्या कोरोनाचा संसर्ग चीननं लपवल्यामुळे आणि काळजी न घेतल्यानं पसरल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात असतानाच आता एका अहवालातून आणखी एक मोठा आरोप चीनवर लावण्यात आला आहे. 7 वर्षांपूर्वीच चीनला या व्हायरसंदर्भात कुणकुण लागली होती. कारण 2013 मध्ये या व्हायरच्या जवळ जाणारे काही विषाणू चीनमध्ये सापडले होते. thetimes.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार चीननं जाणीवपूर्व ही माहिती जगापासून लपवून ठेवली होती. 2013 पासून चीन ही माहिती लपवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार वटवाघूळ आणि उंदरापासून एका विषाणूचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं होतं. 2013 मध्ये मिळालेला विषाणू हा कोरोना विषणूच्या जवळचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हायरसचे स्ट्रेन चीनच्या वुहानमधील रुग्णालयात सापडले होते.

हे वाचा-खासगी हॉस्पिटलकडून दरोडा, 500 च्या PPE कीटची किंमत ऐकून पालिकाही हादरली

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या एक टीमनं चीनमधून पसरणाऱ्या कोरोना संदर्भात माहिती मिळवण्यासाठी गेली होती. याच पाश्वभूमीवर 2013 मध्ये सापडलेल्या विषाणूंचा आताच्या कोरोनाशी संबंध असल्याचं महत्त्वपूर्ण दावा केला जात आहे.

2012 साली खाणीत काम करणारी 6 जणांना कफ, ताप आणि न्युमोनिया सारखा आजारानं ग्रासलं होतं. त्यापैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अहवालातून मिळालेल्या माहितीनुसाार आजारी असलेल्या 4 जणांच्या शरीरातून कोरोना व्हायरसच्या जवळ जाणारे विषाणू आढळून आले होते. तपासणीआधीच त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचा-धक्कादायक! गेल्या 24 तासांत 3 अधिकाऱ्यांसह 30 पोलिसांना कोरोना, 4 जणांचा मृत्यू

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार चीनच्या वुहान लॅबमध्ये वटवाघळातून आलेल्या RaTG13 व्हायरसचे विषाणू ठेवण्यात आले होते. हा विषाणू कोरोनाच्या आजारात 96.2 टक्के आढळून येतो. हाच विषाणून 6 मजूर काम करत अलेल्या ठिकाणी त्यावेळी आढळून आला होता. मात्र चीननं यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नव्हती.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आरोप केला होता. वुहानच्या लॅबमधून हा संसर्ग पसरल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. चीनच्या लॅबमधून या विषाणूचा संसर्ग झाल्याचा आरोप मात्र चीन वारंवार फेटाळून लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 5, 2020, 1:21 PM IST

ताज्या बातम्या