बीजिंग, 26 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाच्या मिराज -2000 विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून जवळपास 325 दहशतवादी आणि 25 कमाडरांचा खात्मा केला. यामध्ये अझर मसूदचा मोठा भाऊ अझहर खान देखील ठार झाला आहे. पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी भारतीय हवाई दलानं ही कारवाई केली. यानंतर पाकिस्ताननं 'आम्ही देखील भारताला उत्तर देऊ' असं म्हटलं. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी 'सैन्याला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे' असं म्हटलं.
दरम्यान, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चीननं देखील प्रतिक्रिया देत दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं मत व्यक्त केलं. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा' अशी प्रतिक्रिया दिली. राजस्थानमधल्या चुरू इथं जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आणखी काय म्हणालं चीन?
पाकिस्तान आणि भारत हे दक्षिण अाशियातील महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे दोघांनी संयम बाळगावा आणि शांतपणे प्रश्न सोडवावेत. आम्ही आशा करतो की दोन्ही देश दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करतील.
LIVE MODI : देश सुरक्षित हातात आहे; एअरस्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींचं पहिलंच जाहीर भाषण
चीनचा भारताला पाठिंबा
दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्र संघात प्रस्ताव मांडला आहे. त्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचं देखील नाव आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा अशी भारताची मागणी आहे. भारताच्या या प्रस्तावाला चीनसह फ्रान्सनं देखील पाठिंबा दिला. फ्रान्स देखील संयुक्त राष्ट्र संघात दहशतवादाविरोधात आवाज उठवणार आहे.
असा झाला Air Strike
पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींना रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्लाचा प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.
IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद