अखेर चीननेही केलं मान्य; भारतीय लष्कराच्या कारवाईत चिनी कमांडिंग ऑफिसर ठार

अखेर चीननेही केलं मान्य; भारतीय लष्कराच्या कारवाईत चिनी कमांडिंग ऑफिसर ठार

भारत-चीन संघर्षानंतर चिनी कमांडिग अधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी चीनकडून जाहीर केली जात नव्हती

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : लडाखच्या गलवान खोऱ्यात 15-16 जून रोजी मध्यरात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू झालेल्या चिनी सैनिकांपैकी एक कमांडिंग ऑफिसरही होता. गेल्या आठवड्यात चीनने गलवानमध्ये भारतासोबत झालेल्या लष्करी चर्चेत चीनने हे मान्य केलं आहे.

सोमवारी सूत्रांनी ही माहिती दिली. हिंसक संघर्षाच्या एक आठवड्यानंतर चिनी सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. सैन्याच्या सुत्रांनी सांगितले की, हिमालयातील गलवान नदीजवळ 15,000 फूट उंचीवर झालेल्या संघर्षात 45 चिनी सैनिक ठार किंवा जखमी झाले. बीजिंगने अद्याप याबाबत कोणतीही जीवितहानीची आकडेवारी दिली नाही. चीनबरोबर झालेल्या या हिंसक चकमकीत भारतीय अधिकारी कर्नल बीएल संतोष बाबूही शहीद झाले. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जखमी झालेल्या 76 भारतीय सैनिक काही आठवड्यांत कर्तव्यावर परत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान सार्वजनिक स्तरावर निवेदनांव्यतिरिक्त, चीन गलवान खोऱ्यात दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. राजनयिक स्तरावर असे मत व्यक्त केले जात आहे. चीनने आपल्या डावपेचातून वेळ काढून गलवान खोऱ्यातील नदीकाठच्या प्रदेशात आपली तयारी अधिक बळकट करावी, असे वाटते. चीनच्या हेतूला उधळून लावण्यासाठी भारत तयार आहे. गलवानमध्ये हिंसक संघर्षानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत धोरणात्मक पातळीवर बदल होणे निश्चित आहे. त्याचे निकाल येत्या काही दिवसांत पाहायला मिळतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

हे वाचा-गलवानमधील शहीद कर्नलच्या कुटुंबीयांना 5 कोटींची मदत; पत्नीला सरकारी नोकरीत

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 22, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या