चीनने संपूर्ण देशाचं खूप नुकसान केलं, डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड

चीनने संपूर्ण देशाचं खूप नुकसान केलं, डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या अनेक दिवसांपासून चीनवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत

  • Share this:

वॉशिंग्टन, 6 जुलै : जगभरात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असताना अमेरिका आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा चीनला खडे बोल सुनावले आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा चीनवर मोठा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनने अमेरिका आणि संपूर्ण जगाचे बरेच नुकसान केले आहे.

दोन्ही देशांमध्ये आर्थिक पातळीवर युद्ध सुरू आहे, तर दक्षिण चीनमध्येही दोन्ही देशांचे नौदल समोरासमोर आहे. चीनपासून पसरलेल्या या साथीचा परिणाम अमेरिकेला सर्वाधिक झाला आहे आणि यामुळे त्यांची यंत्रणा देखील कोलमडली आहे. यामुळे ट्रम्प सतत चीनवर टीका करत आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हटले होते की जेव्हा काही देशांकडून कोट्यवधी डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत येत होते, त्याच वेळी चीनकडून व्हायरसचा फैलाव झाल्याचा परिणाम देशाला झाला होता.

हे वाचा-भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, “अमेरिकेत गाऊन, मास्क आणि शस्त्रक्रिया वस्तू बनविल्या जात आहेत, ज्यापूर्वी केवळ परदेशी देशात, विशेषत: चीनमध्ये या वस्तू बनविल्या जात होत्या जेथून हा व्हायरस आणि इतर गोष्टी आल्या आहेत. हा आजार जगभर पसरत असल्याने चीनने हा रोग लपविला. यासाठी चीनला पूर्णपणे जबाबदार धरले पाहिजे.

 

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

 

 

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 6, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading