पंतप्रधान मोदींच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल, शिवसेनेचं केलं कौतुक

पंतप्रधान मोदींच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल, शिवसेनेचं केलं कौतुक

'भारतात ‘5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या हाती भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे'

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक करून चिनी 59 अ‍ॅपवर बंदी आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून डिजीटल स्ट्राईकवर परखड भाष्य केले आहे.   ' लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली आहे ती जाग कायम राहावी.  चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी लष्कर या ‘डेटा’चा वापर हिंदुस्थानविरोधात करू शकते, असे आता आपल्या गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळविले. म्हणजे आतापर्यंत देशाची गोपनीय माहिती चिन्यांकडे गेलीच आहे. आता झाले गेले गंगेला मिळाले. सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला डिजिटल पद्धतीने घेतला आहे' असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारने केलेल्या कारवाईचं समर्थन केले आहे.

'या चिनी अ‍ॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच तर मग इतकी वर्षे हे सर्व अ‍ॅप्स व त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरू होते? इतकी वर्षे हे ‘अ‍ॅप’ चालू देणार्‍या सर्वच सरकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल' असं मतही सेनेनं व्यक्त केलं.

अकरावीची ऑनलाइन नोंदणी आजपासून, प्रवेशासाठी असा करा अर्ज

सरकारने जो ‘डिजिटल स्ट्राइक’ चीनवर    केलाय त्यात 59 अ‍ॅप्सची नावे आहेत. हिंदुस्थान सरकारने ‘ऑनलाइन’ कंपन्या बंद केल्यामुळे चीनने नाराजी व्यक्त केली आहे, पण फक्त नाराजी व्यक्त करून काय फायदा? गलवान खोर्‍यात आजही चिनी सैन्य आहे व ते मागे हटायला तयार नाही.  चीनच्या डोळय़ांत डोळे घालून बोलण्याची हिंमत आपल्यात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्‍या कोटय़वधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल' असं म्हणत सेनेनं पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे.

चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार?

'टिकटॉकसारखे चिनी अ‍ॅप अश्लीलता व इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते व त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे' असा टोलाही टिकटॉक स्टार्सला लगावण्यात आला आहे.

पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

‘5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला'

'चीनच्या अर्थव्यवस्थेला झटका देणे गरजेचे होतेच, पण फक्त ऍपवर बंदी घालून त्याचे कंबरडे मोडेल असे नाही. चीनचा हिंदुस्थानातील व्यापार व गुंतवणूक हा विषय आहे. सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातसारख्या राज्यात आहे. हिंदुस्थानात ‘5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या हाती हिंदुस्थानच्या डिजीटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये? लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली आहे ती जाग कायम राहावी' अशी अपेक्षाही सेनेनं व्यक्त केली.

 संकलन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading