मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुलांना जंक फूडची सवय लागलीय? अशाप्रकारे पौष्टिक पदार्थांना द्या जंक फूडचा टच

मुलांना जंक फूडची सवय लागलीय? अशाप्रकारे पौष्टिक पदार्थांना द्या जंक फूडचा टच

आजकाल जंक फूड खाणे ही अनेक मुलांची सवय झाली आहे. अशा परिस्थितीत काही मुले अनेकदा घरी किंवा बाजारातील चॉकलेट, पिझ्झा, बर्गर आणि नूडल्स खाण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर मुलांच्या शरीरात पोषणाचीही कमतरता जाणवते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 2 ऑगस्ट : मुलांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. मात्र काही मुलांना हेल्दी आणि पोषक आहारापेक्षा जंक फूड खाण्याची जास्त आवड असते. त्यामुळे मुले अनेकदा जंक फूड खाण्याचा आग्रह धरतात. पण जंक फूडचे सेवन लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून मुलांच्या या सवयीवर सहज नियंत्रण ठेवता येते.

मुलांमध्ये जंक फूड किंवा स्ट्रीट फूडचे सेवन करणे आजकाल सामान्य झाले आहे. मात्र जास्त जंक फूड खाल्ल्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसतो. त्यामुळे अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीरात पोषणाची कमतरता तर होतेच पण त्यामुळे मुलांची वाढही खुंटते. मात्र आपण काही टिप्स वापरून मुलांचे जंक फूडचे व्यसन आटोक्यात आणू शकतो. जसे की मुलांचे आवडते पदार्थ आरोग्यदायी बनवणे किंवा त्यांना आकर्षक पद्धतीने फळे खायला घालणे. चला तर मग जाणून घेऊया मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्याचे काही सोपे उपाय.

घरगुती डिश बनवा

मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखण्यासाठी सर्वप्रथम त्यांना बाहेरचे अन्न कमी करावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही मुलांच्या आवडीचे पदार्थ घरी बनवून खाऊ शकता. यासोबतच पिझ्झा, बर्गर, नूडल्स यांसारख्या गोष्टींमध्ये भाज्या मिसळून मुलांचा आवडता पदार्थही तुम्ही निरोगी बनवू शकता. त्यामुळे मुलांना घरचे जेवणही आवडेल आणि बाहेरचे पदार्थ खाणे कमी होईल.

Healthy Fries : मुलांना अनहेल्दी बटाट्याच्या फ्राईजपासून ठेवा दूर, बनवा हे दोन प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी फ्राईज

गार्निशिंग विसरू नका

सुंदर आणि रंगीबेरंगी गोष्टींकडे मुलं पटकन आकर्षित होतात. अशा स्थितीत नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना विविध रंगांची फळे सजवून देऊ शकता. यासोबतच ताटात सुंदर सजवलेल्या रंगीबेरंगी फ्रूट चाटही मुलांना आवडतील. तसेच तुम्ही वेगवेगळ्या आकारात पोळ्या बनवून मुलांना खायला देऊ शकता.

Health Tips: शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डबा बनवताय? 'या' हेल्दी टिप्स एकदा पाहाच

निरोगी गोष्टी खायला शिका

मुलांना अनेकदा काहीतरी खाण्याची तल्लफ असते. अशा परिस्थितीत मुले जंक फूडला महत्त्व देऊ लागतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुलांना भूक लागेल, ती छोटी भूक का असेना. मात्र मुलांना घरातलेच पदार्थ खायला शिकवा आणि भूक लागल्यावर लगेच मुलांना खायला द्या. अशाप्रकारे मुलांचे पोट भरलेले राहते आणि ते दुसरे काही खाण्याचा जास्त हट्ट करत नाहीत.

First published:

Tags: Lifestyle, Parents and child, Processed food