मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

आपल्या चुलत भावाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या भावानेच खोडसाळपणे फोटो व्हायरल केल्याचं उघड झालं असून नाशिक पोलिसांनी हा कट रचणाऱ्या दोघा भावांना अटक केली आहे.

  • Share this:

प्नशांत बाग, नाशिक,ता,4 जूलै: मुलं चोरणारी टोळी असल्याच्या अफेवेने देशभर अनेकांचे जीव गेले. पण आजपर्यंत पोलिसांना ही टोळी कधीच सापडली नाही, काही समाजकंटकच जाणिवपूर्वक ही अफवा पसरवित असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आपल्या चुलत भावाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या भावानेच खोडसाळपणे फोटो व्हायरल केल्याचं उघड झालं असून नाशिक पोलिसांनी हा कट चरणाऱ्या दोघा भावांना अटक केली आहे.

नाशिकच्या गुलाब रसूल मुलताना आणि त्याच्या भावाने त्यांच्या चुलत भावाचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले होते. नंतर त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर भांडण झालेल्या भावाला धडा शिकवण्यासाठी गुलाबनं त्या चुलत भावाचे फोटो काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले.

नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

लहान मुलं चोरणाऱ्या टोळीचा हा सदस्य असून त्यापासून सावध राहा असं सांगत त्याने फोटोसह माहिती सोशल मीडियावर टाकली. मुलं चोरणाऱ्या टोळीची सगळीकडेच अफवा असल्याने हे फोटो पाहता पाहता व्हायरल झाले आणि त्या भावाला सगळे संशयाने पाहू लागले. अनेकांनी त्याला विचारणा करायला सुरवात केली.

'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

प्रकरण गंभीर वाटल्याने त्याने सरळ पोलिसांना गाठलं आणि सर्व माहिती दिली. पोलिसांनीही तातडीनं कारवाई करत चौकशी केली. जो फोटो व्हायरल झाला तो केव्हा आणि कुणी काढला याचा माग पोलिसांनी घेतला. तेव्हा त्यांना गुलाबची माहिती मिळाली. गुलाबने तीन महिन्यांपूर्वी हा फोटो काढला होता. केवळ गंम्मत म्हणून असं केल्याचं त्यानं पोलिस तपासात कबूल केलं. फोटोसोबतच त्याने एक ऑडिओ क्लिपही व्हायरल केली होती.

तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही 

पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने गुलाबची चौकशी केली आणि  मुलं चोरणाऱ्या मुलांच्या टोळीचं सत्य उघड झालं.

पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवेमुळेच धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं पाच निष्पाप भिक्षुकांचा जीव गेला आणि देशभरातही अनेक ठिकाणी अशाच घटना घडल्या आहे.

First published: July 4, 2018, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading