राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार का? रात्री 8 वाजता होणार स्पष्ट

राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार का? रात्री 8 वाजता होणार स्पष्ट

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 08 मे : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबवण्यात आला. पण तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यात लॉकडाऊन वाढवण्यावर बोलणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला. अनेक कठोर कायदे आणि नियम लागू केल्यानंतरही या रोगाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यावर मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनावर मात करण्यात यश आलं पाहिजे अशा सुचना उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यावरदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मोठी बातमी! विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द

दरम्यान, राज्यावर कोरोनाचं सावट असताना आजा सगळ्यांना हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. औरंगाबादजवळील करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केलं. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात, यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले.

काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 16 मजुरांची नावे समोर

गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहोचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचतील, असं नियोजन झालं असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरू आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असं आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 8, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या