Home /News /news /

Video : शिवसैनिकांची गर्दी, शंखनाद, फुलांचा वर्षाव...;पत्नी रश्मी, मुलांसह उद्धव ठाकरे पडले वर्षाबाहेर...

Video : शिवसैनिकांची गर्दी, शंखनाद, फुलांचा वर्षाव...;पत्नी रश्मी, मुलांसह उद्धव ठाकरे पडले वर्षाबाहेर...

वर्षा ते मातोश्रीच्या रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक उभे होते आणि आपल्या नेत्याला सोबत असल्याचं वचन देत होते.

    मुंबई, 22 जून : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करीत मी आजच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. मला पदाचा मोह नाही, मी आजही मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी समोर यावं, अशी भावनिक साद व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषनानंतर मुंबईभरातून शिवसैनिक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघाले होते. एवरी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात आज अश्रू दिसत होते. आपल्या नेत्याला झालेल्या दु:खामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक दुखावल्याचं सांगितलं जात होतं. शेवटी आज 9 वाजून 45 मिनिटांनी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन मातोश्रीच्या दिशेने निघाले. वर्षाच्या दाराच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्र्यांनी उंबरठा ओलांडताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या गाडीला मुख्यमंत्र्यांनी गराडा घातला. आपल्या नेत्यासाठी हे शिवसैनिक मुंबईतील कानाकोपऱ्यातून येत होते. यावेळी रश्मी ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक (Mumbai Shivsainik On Road) रस्त्यावर उतरले आणि आपल्या नेत्याला पाठिंबा असल्याचं जणू वचनच दिलं. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंच ते यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगत होते. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक सादानंतर मुंबईभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिकाने (Politics of Emotions) रस्त्यावर उतरले. त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या नेत्याला दुखवू नका, शिंदे साहेब परत या असं आवाहन यावेळी शिवसैनिक करताना दिसले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या