Home /News /news /

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, आता लॉकडाउन वाढवू नका'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, आता लॉकडाउन वाढवू नका'

'राज्यातील सर्व व्यवहार हे पूर्वपदावर आणले पाहिजे. राज्यात लॉकडाउन वाढवू नका'

मुंबई, 26 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत  कोरोनामुळे होणार मृत्यू दर आटोक्यात आणू, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानावर 'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका', अशी जळजळीत टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. 'सुरुवातील कोरोना व्हायरसने सर्वांनाच भीती घातली. अमेरिकेच्या हाफकिनी संस्थेनं भारतात 40 टक्के लोकांना कोरोना होईल असं सांगितलं होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी भारतात जास्त कोरोनाचा प्रसार होणार नाही, भारतीय लोकांनी रोग प्रतिकार शक्ती ही चांगली आहे. असं म्हटलं आहे. त्यामुळे लोकं आता लॉकडाउनमध्ये उपाशीपोटी मरतील', अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 'राज्यातील सर्व व्यवहार हे पूर्वपदावर आणले पाहिजे. राज्यात लॉकडाउन वाढवू नका', अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. पंतप्रधानांच्या स्वप्नावर उद्धव ठाकरेंनी फेरले पाणी,फडणवीसांसह भाजपला मोठा हादरा शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनबद्दल स्पष्ट भूमिका मांडली होती. 'कोरोनाच्या संकटाबद्दल मला आधी एक सांगायचंय की, हे कोरोनाचं संकट ते अजूनही संपता संपत नाहीय. मी माझ्या एका फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलंसुद्धा होतं की, ‘सरणार कधी रण…’ हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही.' असं स्पष्ट उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच, 'मुळात हे रणच आहे. रणकंदन आहे. मोठं जागतिक रण आहे. 'पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहेच. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे. लोकांना  कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन केलेलं नाही किंवा उघडायचं असं नाही. पुणे हादरलं, बंद घरात आढळले सडलेल्या अवस्थेत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण,  त्यासाठी एकदम जर घिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Prakash ambedkar, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर

पुढील बातम्या