मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

संकटाच्या काळात तुम्ही राजकारण केलं नाही, त्याबद्दल आभार, उद्धव ठाकरेंनी केलं नितीन गडकरींचं कौतुक

संकटाच्या काळात तुम्ही राजकारण केलं नाही, त्याबद्दल आभार, उद्धव ठाकरेंनी केलं नितीन गडकरींचं कौतुक

नितीन गडकरी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितीन गडकरी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितीन गडकरी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 26 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसंच यावेळी त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'नितीन गडकरी यांचे धन्यवाद...कारण आताच्या स्थितीत त्यांनी राजकारण बाजूला ठेवलं...केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करत आहेत...पण गडकरींनी सल्ला आहे की सर्वांनी राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी राहा...याबद्दल गडकरी यांना धन्यवाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे: - विविध पंथांचे सण आणि उत्सव आहेत...त्यांना शुभेच्छा - जसं तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं आहे...तसंच पुढे करा - सगळेजण घरातली घरात प्रार्थना करा - सर्व प्रार्थना स्थळे बंद आहेत, तर देव कुठे आहे?देव आता मंदिरात नाही..देव आता आपल्यासोबत आहे..आपले कर्मचारी लढत आहेत..त्यांच्यामध्ये देव आहे - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली - आपण संयमाने ही परीक्षा देत आहोत - पोलीस स्वत:चं घर दार बाजूला ठेवून मेहनत करत आहेत - शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना मदत करणार - पोलीस, डॉक्टर्स हे अत्यंत तणावाखाली मेहनत करत आहे - लॉकडाऊन कधी संपणार? लॉकडाऊनचे नक्कीच फायदे आहेत...लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार होण्यापासून आपण थांबवू शकलो आहे. - जगभरात कुठेही लस तयार होतेय, अशी माहिती मिळताच आपण संपर्क करतोय - कोरोनाच्या आकड्यांमध्ये लपवाछपवी होत आहे, असा आरोप होतोय....पण अशी कोणतीही लपवाछपवी करण्यात आलेली नाही - केंद्रालाही आम्ही सांगितलं आहे की, तुम्ही त्रयस्थपणे परिस्थितीचं निरीक्षण करा...काही सुधारणा असतील तर सांगा
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या