मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोठी बातमी, पंतप्रधान मोदी आणि शहांची भेट न होताच मुख्यमंत्री शिंदे परतणार, भाजपने दिले करेक्ट संदेश?

मोठी बातमी, पंतप्रधान मोदी आणि शहांची भेट न होताच मुख्यमंत्री शिंदे परतणार, भाजपने दिले करेक्ट संदेश?

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत

नवी दिल्ली, 19 जुलै : शिवसेनेत बंड पुकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, 17 दिवस उलटले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहे. पण, पंतप्रधान मोदी (pm narendra modi) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. दिवसभर भाजपच्या खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिवसेनेचे बंडखोर खासदारांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मात्र, आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांचा 15 दिवसांतला हा दुसरा दौरा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच फडणवीस यांच्यासह न येता एकटेच आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकाराचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. पण, भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक महत्त्वाची खाती ही आपल्याकडेच असणार असं स्पष्ट केलं आहे. शिंदे गटाकडून एकूण 19 खात्यांची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट!

दरम्यान, शिवसेनेच्या 12 खासदारांनी (Shivsena MPs) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेची भेट घेतलेल्या या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांना भेटण्याआधी या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे. पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे.

First published:
top videos