नाशिक, 20 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे, पंचांगाचा अभ्यास करून ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील, कोणत्या राहू-केतूंची शांती करायची ते पाहतील
मग विस्तार होईल अशी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.
मुख्यमंत्र्यांवर टीका
कसं आहे मुख्यमंत्री महोदयच ब्राह्मण आहे. योगायोगाने पंचांगाचा अभ्यास करून ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. त्यांना राहू कोण, केतू कोण हे कळतं. त्यावर सगळं अवलंबून आहे अशी विखारी टीकाही पाटील यांनी केली.
'साहजिकच पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढणार'
पेट्रोलचे दर हे 100 रुपये होण्याची वाट बघतोय. आता वरतूनच अशी मानसिकता करून टाकलीये. पेट्रोलचे दरच बदलले नाही तर पेट्रोल पंपावरील पोस्टही बदलले आहे. पूर्वी एका म्हातारीबाई होती आता तिथे एक माॅडेल आलीये. साहजिकच पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढणार आहे असं पाटील म्हणाले.
'मतदान करताना लक्षात ठेवा'
तसंच लोकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी सत्ता भाजपचीच येतीये. प्रतिक्रिया करणे प्रतिक्रिया पेटीत टाकणे यात फरक आहे. लोकांच्या हाती शस्त्र आहे त्यांनी पुढच्या निवडणुकीला वापरावे असा सल्लावजा टोलाही पाटील यांनी लगावला.
'आता फक्त शिवसेना आंदोलन करतेय'
आम्ही जेव्हा सत्तेत नव्हतो तेव्हा शिवसेना आंदोलनं करायची, भाजपही आंदोलनं करायची. पण आता फक्त शिवसेना आंदोलन करतेय.जर इतर राज्य भार उचलत असतील तर राज्य सरकारने भार उचलला पाहिजे असा सल्लाही पाटील यांनी सरकारला दिला.
=========================================================================
VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा