• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोल्हापूर परिसरात पुन्हा अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला केली विनंती
  • VIDEO: कोल्हापूर परिसरात पुन्हा अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला केली विनंती

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 07:49 PM IST | Updated On: Sep 8, 2019 07:49 PM IST

    मुंबई, 08 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे. अलमट्टीतून सध्या 1 लाख 70 हजार क्युसेक पाण्याचा सुरू असलेला विसर्ग 2 लाख 20 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्याची विनंती कर्नाटकला करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरासारखा पूर पुन्हा येतो की काय, अशी भीती आहे. काही मोजक्या गावांमधून लोकांनी तात्पुरतं स्थलांतरही सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला केलेल्या विनंतीला महत्व प्राप्त झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading