• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • अनेक बंगले, कोटींची FD, सोनं आणि वर्षाला 8.5 कोटींची कमाई; एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

अनेक बंगले, कोटींची FD, सोनं आणि वर्षाला 8.5 कोटींची कमाई; एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

राज्यसभा निवडणुकांसाठी चिदंबरम यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चिदंबरम यांचं संपूर्ण कुटुंब हेच कोट्यावधी संपत्तीचे मालक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : आयएनएक्स(INX) मीडिया प्रकरणात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या संपत्तीविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. देशातच नाही तर विदेशातही त्यांचे अनेक बंगले आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. यामध्ये कोटींची एफडी आणि वार्षिक उत्पन्न 8.6 कोटी इतकं आहे. ही चिदंबरम यांची कौटुंबिक संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडून घोषित केलेल्या संपत्तीनुसार चिदंबरम यांच्याकडे एकूण 175 कोटी आहे. खरंतर चिदंबरम यांची वास्तविक संपत्ती जास्त असावी असा अंदाज तपास यंत्रणेचा आहे. राज्यसभा निवडणुकांसाठी चिदंबरम यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चिदंबरम यांचं संपूर्ण कुटुंब हेच कोट्यावधी संपत्तीचे मालक आहे. पत्नी आणि चिदंबरम यांच्याकडे एकून 95 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार, चिदंबरम यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळपास 95.66 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्याच्यावरही पाच कोटी रुपयांचं कर्ज आहे. 4 वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला होता. दुसरीकडे मुलगा कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती 80 कोटी रूपये जाहीर केली आहे. 2014-15मध्ये त्यांनी 8.5 कोटी इतकं उत्पन्न दाखवलं होतं. तर त्यांच्या पत्नीचं 1.25 कोटी इतकं उत्पन्न आहे. इतर बातम्या - चिदंबरम यांच्यावर कारवाई;अमित शहा म्हणाले होते,'मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा' परदेशात विस्तारलेली आहे चिदंबरम यांची मालमत्ता - चिदंबरम यांच्याकडे पाच लाखांची रोकड असून बँका आणि अन्य संस्थांमध्ये 25 कोटी रुपये जमा आहेत. - 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स इत्यादी आहेत. तर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सुमारे 35 लाख रुपये जमा आहेत. - दहा लाख रुपयांची विमा पॉलिसी, 27 लाख रुपयांची वाहनं आणि 85 लाख रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. - त्याची सर्वात मोठी ठेव 20 कोटी आहे तर सर्वात कमी 3 हजार रुपये आहे. - यांसह, यूकेमधील केंब्रिजमध्ये 1.5 कोटींची मालमत्ता, 7 कोटीची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यावसायिक इमारती आणि 32 कोटींच्या घरांचा समावेश आहे. 54 कोटींच्या संपत्तीवर ईडीकडून टाच ईडीने चिदंबरम कुटूंबाच्या 54 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ही मालमत्ता भारत, ब्रिटन आणि स्पेनमध्ये आहे. यामध्ये तामिळनाडूतील ऊटी आणि कोडईकनाल येथील बंगला आणि शेतीची जमीन, दिल्लीच्या जोरबाग येथील कार्ती आणि तिच्या आईच्या नावावर 16 कोटींचा बंगला, ब्रिटनमधील 8.67 कोटी रुपयांचा कॉटेज आणि घर, स्पेनमधील बार्सिलोनामध्ये 14.5 कोटींचा टेनिस क्लब यांचा समावेश आहे. तर ठेवीमध्ये 90 लाख रुपयांची एफडी समाविष्ट आहे. SPECIAL REPORT : मोदींना नडणाऱ्या ममतादीदी जेव्हा टपरीवर बनवतात चहा!
  Published by:Renuka Dhaybar
  First published: