VIDEO : सहकाऱ्यांचा निरोप घेताना पोलीस अधिकाऱ्याला अश्रू अनावर

VIDEO : सहकाऱ्यांचा निरोप घेताना पोलीस अधिकाऱ्याला अश्रू अनावर

तिवारी यांच्या बदलीमुळे सहकारी भावूक झाले. त्यांना निरोप देताना तिवारी यांना रडू कोसळलं. अत्यंत भावूक असा हा क्षण सोशल मीडियावर भावूक झालाय.

  • Share this:

मध्यप्रदेश, 03 जुलै : शिक्षकांची बदली झाली म्हणून विद्यार्थी भावूक झाल्याची घटना अलीकडेच तामिळनाडूमध्ये घडली पण आता एका आयपीएस अधिकाऱ्याची बदली झाली म्हणून सहकारी आणि खुद्द आयपीएस अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मध्यप्रदेशमधील दंबग पोलीस अधिकारी म्हणून एसपी गौरव तिवारी यांची ओळख आहे. तिवारी यांनी हवाला कांडचा खुलासा केला होता. गौरव तिवारी यांचं छिंदवाडाहुन देवास इथं बदली करण्यात आलीये.

रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल

तिवारी यांच्या बदलीमुळे सहकारी भावूक झाले. त्यांना निरोप देताना तिवारी यांना रडू कोसळलं. अत्यंत भावूक असा हा क्षण सोशल मीडियावर भावूक झालाय.

मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस

आपल्या कारकीर्दीत तिवारी यांचीही तिसरी बदली आहे. सुरुवातीला हे कटनी इथं होते त्यानंतर छिंदवाडा इथं आले आता देवास इथं बदली झालीये.

तिवारी हे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. कटनी इथं त्याने 500 कोटींचा हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या घटनेत अनेक मोठ्या धेंड्याची नावं समोर आली होती. त्यानंतर त्यांची तिथून बदली झाली होती. त्यावेळी त्यांच्या बदलीविरोधात एक आठवडा लोकांनी निदर्शनं केली होती.

पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी

First published: July 3, 2018, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading