छावा संघटनेच्या उपोषणाचा पालकमंत्र्यांनी घेतला धसका, रात्रीच्या वेळी अचानक दिली भेट

छावा संघटनेच्या उपोषणाचा पालकमंत्र्यांनी घेतला धसका, रात्रीच्या वेळी अचानक दिली भेट

राज्यातील शेतकऱ्यांचा तसेच औसा वासियांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील हे मागील आठ दिवसांपासून औसा तहसील समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

  • Share this:

नितीन बनसोडे, (प्रतिनिधी)

लातुर, 23 ऑगस्ट-राज्यातील शेतकऱ्यांचा तसेच औसा वासियांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील हे मागील आठ दिवसांपासून औसा तहसील समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे मुख्य सचिवांचे पत्र येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा विजय घाडगे पाटील यांनी निर्धार केला आहे.

विजय पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची झोप उडाली आहे. पालकमंत्र्यांना रात्रीच्या सुमारास उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. शिवाय उपोषणाच्या ठिकाणी भाषण देखील ठोकलं. मात्र, याचा उपोषणकर्त्यांवर काहीच परिणाम झाला नाहीय. पालकमंत्री एवढं देखील म्हणाले की, उपोषण सोडलं नाही तर मी सोबत घेऊन जाईन आणि मी देखील छावाच आहे. पालकमंत्र्यांच्या या विनवणी नंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन आणि पालकमंत्र्यांसाठी हे उपोषण मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्याच्या उग्र आंदोलनाचे वेगळे पडसाद देखील उमटण्याची चिन्ह सध्या दिसत आहे.

औसा बंदला सर्व पक्ष संघटना आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद..

मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी, विज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा तात्काळ देण्यात यावा, माकणी धरणाचं पाणी कायमस्वरूपी औसा शहराला मिळावं, यासह अन्य मागण्यासाठी औसा येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून छावा संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु आहे. उपोषणकर्ते विजय घाडगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत असल्याने संतापलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवाकी औसा बंदची हाक दिली होती.

छावाच्या या बंदला देखील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. याशिवाय छावाच्या या आंदोलनाला सर्वच पक्षांनी पाठींबा दर्शविलाय. तहसील प्रशासनानं देखील उपोषणकर्त्यांना भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणकर्त्यानी प्रशासनाला प्रतिसाद दिला नाही. याच मागण्यांसाठी छावाच्या वतीने उद्या मराठवाडा बंदची हाक देण्यात आली आहे.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना पुन्हा सरकारला आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading