2.40 कोटींचे इनाम असलेल्या नक्षलवादी कमांडर रमन्नाचा हृदयविकाराने मृत्यू

2.40 कोटींचे इनाम असलेल्या नक्षलवादी कमांडर रमन्नाचा हृदयविकाराने मृत्यू

रमन्नाच्या मृत्यूच्या बातमीसंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

सुकमा, 10 डिसेंबर : कुख्यात गुंड(Most Wanted) नक्षलवादी कमांडर रमन्ना याचा मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रमन्नाचे (Naxali Ramanna)निधन हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने झाले. ही बातमी येताच सुरक्षा संस्था आणि पोलीस सतर्क झाले आहेत. तथापि, याबद्दल अधिकृतपणे अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

रमन्नाच्या मृत्यूच्या बातमीसंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. तेलंगणा, ओडिशा आणि छत्तीसगड सरकारने नक्षलवादी रामन्नावर सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

इतर बातम्या - घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

10 मोठ्या हल्ल्यांचा होता मास्टरमाईंड

रमन्ना मागील दशकात सुरक्षा दलांना लक्ष्य करून दहा मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यांमध्ये 55 सैनिक शहीद झाले होते. एप्रिल 2010 मध्ये ताडमेटलाच्या चिंतलनार गावात सीआरपीएफच्या 76 जवान  शहीद झाले होते. , दरभा खोऱ्यात काँग्रेस नेत्यांच्या काफिलावरील हल्ल्याच्या घटनांमध्येही त्याचा हात होता. यापूर्वीही रमन्नाच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, ज्या नंतर चुकीच्या असल्याचे समोर आलं होतं.

इतर बातम्या - फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading