छपाक- सेटवरचा अजून एक व्हिडीओ लीक, रिक्षातून प्रवास करताना दिसली दीपिका पदुकोण

छपाक- सेटवरचा अजून एक व्हिडीओ लीक, रिक्षातून प्रवास करताना दिसली दीपिका पदुकोण

'छपाक'च्या लूकमधला आता दीपिकाचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ चित्रीकरणादरम्यानचा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, १८ एप्रिल- दीपिका पदुकोण सध्या दिल्लीत तिच्या आगामी 'छपाक' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. असिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या असमान्य लढ्याची कहानी यात सांगण्यात आली आहे. या व्यक्तीरेखेसाठी दीपिका अगदी लक्ष्मीसारखीच दिसते. आतापर्यंत 'छपाक' सिनेमातील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

'छपाक'च्या लूकमधला आता दीपिकाचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ चित्रीकरणादरम्यानचा आहे. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मैसीही दिसतो. व्हिडीओमध्ये लाल ओढणी- पायजमा आणि ब्राऊन कुर्त्यात दीपिका एका सर्वसामान्य मुलीसारखी दिसते. यात दीपिका आणि विक्रांत दोन वेगळ्या रिक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत.

सध्या 'छपाक'चं चित्रीकरण दिल्लीत होत असून दिल्लीतील कडक गर्मीचा सामना संपूर्ण टीमला करावा लागत आहे. उन्हामुळे दीपिकाने आपल्या डाएटमध्येही बदल केले आहेत. दीपिकाने आपल्या डाएटमध्ये थंड पदार्थांचा समावेश केला आहे. सत्तू खात ती स्वतःला हायड्रेट ठेवते.

मेघना गुलझार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

First published: April 18, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading