नाशिक,ता.14 जून : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. भुजबळ यांचं पाथर्डी फाटा येथे जोरदार स्वागत. समता परिषद आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित.
ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. छगन भुजबळांसोबत समीर भुजबळही उपस्थित आहेत. नाशिक नंतर छगन भुजबळ येवल्यातही जाणार असून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांवरून छगन भुजबळांवर गुन्हे दाखल असून दोन वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर त्यांना अखेर जामीन मिळाला आहे. जमीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावरची टांगती तलवार मात्र अजूनही कायम आहे.
मात्र प्रतिमेला लागलेला धक्का आणि गेलेली पत पुन्हा मिळावण्यसाठी छगन भुजबळांचं हे शक्तीप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे.
आरोपांच्या सर्व अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर येईल, कार्यकर्त्यांनीही संघर्षासाठी तयार राहावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना केलं.
हेही वाचा...
...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे
VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ
'रायझींग काश्मीर'च्या संपादकांची श्रीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या