राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला तरी जाऊ द्या-छगन भुजबळ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करू द्या अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पीएमएलए कोर्टाला केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2017 07:31 PM IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला तरी जाऊ द्या-छगन भुजबळ

विवेक कुलकर्णी, मुंबई

30 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करू द्या अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पीएमएलए कोर्टाला केली आहे. यावर कोर्टात सोमवारी पुढील सुनावणी आहे.

ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे. ईडीनं विरोध करताना तीन मुद्दे मांडले आहेत.

1. पीएमएलए कायद्याच्या कलम ४४ नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या ५४ व्या कलमानुसार मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाहीये

2. पीएमएलए कोर्ट एखाद्या कैद्याविषयी विशेष सुविधा देण्याचे आदेश देऊ शकत नाही, असा आदेश हायकोर्ट रिट याचिकेवरच देऊ शकते

Loading...

3. लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम ६२(५) राष्ट्रपती निवडणुकीसाठी लागू करता येतं का याची केस सुप्रीम कोर्टासमोर सुरू आहे, त्यामुळे या कोर्टाने त्या संदर्भात कोणतेही आदेश देऊ नयेत. घटनात्मक खंडपीठानं याचा निर्णय घ्यावा.

यावर पीएमएलए कोर्टाने भुजबळ यांच्या वकिलाला आपल्याला अर्ज मागे घ्यायचा आहे का अशी विचारणा केली त्यावर आपण भुजबळांशी बोलून अर्ज मागे घ्यायचा आहे की हायकोर्टात धाव घ्यायची आहे हे कोर्टाला कळवण्यात येईल असं म्हटलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...