'तुकाराम' नावाप्रमाणे वागा, छगन भुजबळांचा आयुक्त मुंढेंना टोला

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2018 04:46 PM IST

'तुकाराम' नावाप्रमाणे वागा, छगन भुजबळांचा आयुक्त मुंढेंना टोला

कपिल भास्कर, प्रतिनिधी

नाशिक, 10 सप्टेंबर : मुंढे साहेब मी मुंबईचा महापौर होतो म्हणून तुमच्या दारात आलो आहे. तुकाराम नावाप्रमाणे वागा असा जोरदार हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे. नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आलेली भरमसाठ करवाढ सरसकट रद्द करावी यासह नाशिककरांच्या अनेक प्रश्नांवर आज (सोमवार दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी) छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर भव्य जनआंदोलन छेडण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

नाव तुकाराम आहे तर नावाप्रमाणे वागा. महापौर आणि नगरसेवकांना विश्वासात घ्या. मनपा कर्मचाऱ्यांवर दडप शाही करू नका असा सल्ला देत त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. तर करवाढ सरसकट रद्द नाही झाली तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनादेखील टॅक्स वाढवताना विधानसभेची परवानगी घ्यावी लागते. हा वाढवलेला टॅक्स चुकीचा आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला. तर आम्ही मुंढे विरोधात अविश्वस ठरवावर सही केली नाही. कारण म्हटलं इथलं दुखणं दुसरी कडे नको अशा शब्दात त्यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिककडेही लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने सिडको घरावर कारवाई होत असेल तर एकाही घराला हात लावू देणार नाही. नियम कडक केले म्हणून नाशिकचे अनेक हॉस्पिटल बंद झाली. 40 मुलं नाही म्हणून अंगणवाडी बंद झाली हा कुठला नियम आहे असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. मुंढे साहेब तुम्ही सगळ्यांवरची दादागिरी बंद करा असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Loading...

महापालिकेत झालेल्या या जनआंदोलनामध्ये छगन भुजबळ यांनी भाजप सरकावर निशाणा साधला. भाजपवाले लोक हे लिचे-पिचे आहेत. त्यांना एक आयुक्तही पेलवत नाही.

सुधारांच्या नावाखाली टॅक्स वसूल करून विकास करणे आम्हाला मान्य नाही. इथं हुकूमशाही चालणार नाही. चांगलं काम करत असतील तर ठीक आहे. नाहीतर हे जनआंदोलन तर फक्त ट्रेलर आहे. नाशिकची जनता कायदा हाहातही घेऊ शकते अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

 

भारत बंद : गाढवगाडी, रेल रोको, धरपकड आणि घोषणाबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...