नाशिक, ता,2 जुलै : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या जामीनावर आहेत. राज्य सरकारनं सुडबुध्दीनं कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला आहे. त्यामुळं गेली तीन वर्ष भाजपने त्यांच्याविषयी फारशी जवळीक दाखवली नाही.
मात्र आज वणीच्या सप्तश्रृंगी गडावर रोप-वे च्या उद्धघाटना निमित्त आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आमने-सामने आले. अॅण्टीकरप्शन ब्युरो आणि पोलीसांचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून भुजबळांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे.
हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर
लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी
याची सर्व सूत्र गृहमंत्री असल्याने देवेंद्र फडणवीसांकडे आहेत, त्यामुळं या दोघांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या बाजुला पालकमंत्री गिरीष महाजन आणि त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसले होते. अधून मधून भुजबळ आणि गिरीष महाजन आणि मुख्यमंत्री यांच्यात बोलणं व्हायचं तेव्हा लगेच सगळ्या कॅमेऱ्यांचा झोत त्यांच्यावर जायचा.
भाषणात भुजबळांनी त्यांच्यावरच्या अन्यायाचा किंवा मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत काहीही भाष्य केलं नाही. रोप-वे हा छगन भुजबळांचा ड्रिम प्रोजक्ट असल्याने या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. कार्यक्रम रोप-वेच्या उद्घाटनाचा असला तरी सगळ्यांच्या नजरा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांकडे लागल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhagan bhujbal, Devendra Fadnavis, Nashik, Stage