भुजबळांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, जामीनाची प्रक्रिया पूर्ण

भुजबळांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, जामीनाची प्रक्रिया पूर्ण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जमीनाबाबत कारागृहातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळं त्यांच्या बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई,ता.06 मे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जमीनाबाबत कारागृहातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भुजबळांवर सध्या केईम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळं सर्व प्रक्रिया रूग्णालयातच पूर्ण करण्यात आली.

आता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छगन भुजबळांना कोठडीमध्ये असतानाची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेण्यात आली आहे. केईमच्या डॉक्टरांशी सल्ला मसलत केल्यानंतरच पुढचा निर्णय भुजबळ कुटूंबिय घेणार आहेत. खासगी रूग्णालयात जावून उपचार घ्यायचा की केईममध्येच राहून उपचार घ्यायचा याचा निर्णय होणार आहे.

भुजबळ आता घरी जावूनही उपचार घेऊ शकतात. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून ते बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

 

 

First published: May 6, 2018, 6:15 PM IST

ताज्या बातम्या