लॉकडाऊनचा असाही फायदा, कलाकाराने 3888 'Push Pins'ने साकारलं उद्धव ठाकरेंचं अनोखं पोट्रेट

लॉकडाऊनचा असाही फायदा, कलाकाराने 3888 'Push Pins'ने साकारलं उद्धव ठाकरेंचं अनोखं पोट्रेट

जेजे स्कुल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या चेतन राऊतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : मुंबईमध्ये सध्या संचार बंदी सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकारदेखील घरीच बसून आहेत. मात्र कलाकार मिळालेल्या वेळेत ही काही न काही कलाकारी करीतच असतात. अशाच प्रकारे पवई येथील रहिवासी असलेला आणि जेजे स्कुल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या चेतन राऊतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे.

घरातच बसून पुशपिनच्या सहाय्याने त्याने हे पोट्रेट बनविले आहे. यात 3888 इतक्या पुश पिन वापरण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करीत असलेल्या कामाचे कौतुक आणि त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी हे पोट्रेट चेतनने बनविले असल्याचे त्याने सांगितले. पेपर किंवा एखादी वस्तू अडकवण्यासाठी वापरण्यात येणारे हे पुशपिन असेही वापरले जातील याचा तुम्ही विचारही करू शकणार नाहीत.

या संबंधी चेतनने एक फेसबुक पोस्टही केली आहे. त्याने याआधीही असे अनेक पोट्रेट बनवले आहे, ज्याची जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे. चेतनने चार हजारहून अधिक कॅसेट्सचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिचित्र साकारलं होतं. कॅसेट हा प्रकार आता दुर्मिळ झाला आहे. पण याचा वेगळा उपयोग चेतनने करण्याचं ठरवलं. चार हजारहून अधिक कॅसेटचा वापर करून चेतनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तीचित्र साकारलं होतं.

मुंबईतल्या चोरबाजार, मुंब्रा, लॅमिंग्टन रोड या ठिकाणच्या जुन्या सीडी विक्रेत्यांशी संपर्क साधून चेतनने हजारो सीडीज मिळवल्या. पिक्सेल आणि थ्रीडी पेंटिंग यांचं फ्युजन असणारं शिवरायांचं मोझॅक आर्ट या सीडीजच्या माध्यमातून त्याने साकारलं. तब्बल चार-पाच महिन्यांच्या प्रयत्नांतून चेतननं 75 हजारपेक्षा जास्त सीडीज गोळा केल्या होत्या. 110 फुट x 90 फुट या भव्य आकाराचं हे जगातलं सर्वात मोठं पोट्रेट ठरलं.

स्क्रॅप मार्केटमधून त्यानं आपल्या या नव्या कलाकृतीसाठी बटणं गोळा केली आहेत. कलाम यांचं हे पोट्रेट तयार करण्यासाठी चेतननं 87 हजारांहून अधिक (साधारण 25 हजार कीबोर्ड्सची) बटणांचा वापर केला. पोट्रेट अधिक आकर्षक बनवण्यासाठी ही बटणं नऊ रंगांमध्ये रंगवण्यात आली.

First published: March 28, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या