गरोदरपणात सर्व महिला खरं तर विशेष काळजी घेतच असतात. गर्भवती महिलेला कोणताही त्रास होऊ नये याकडे घरातील सर्व लोक लक्ष देत असतात. प्रेग्नन्सीमध्ये महिलांना बऱ्याच प्रकारच्या समस्या (problems during pregnancy) जाणवतात. मात्र, बऱ्याच वेळा असं होतं, की शरीराचं प्रत्येक दुखणं प्रेग्नन्सीमुळे असल्याचा विचार करुन त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यातील एक समस्या म्हणजे छातीत (Chest pain during pregnancy) दुखणं. मात्र, याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गरोदरपणात पोटावर आणि फुफ्फुसांवर ताण पडतो. त्यामुळे छातीत दुखण्यास सुरुवात होते. गर्भाचा आकार मोठा होत असल्यामुळे पोटावरील हा ताण वाढत जातो. यामुळे कित्येक महिलांना श्वास घेण्यास अडचण (breathing difficulty), धाप लागणं, भीती वाटणं, छातीत दुखणं, हृदयाची गती (heart beat increase) वाढणं अशा समस्या जाणवतात. कित्येक वेळा यामागे गॅस किंवा असिडिटी हे कारणही असते. मात्र, हे गृहित न धरता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण, याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठीही (precautions during pregnancy) धोक्याचं ठरू शकतं.
हे ही वाचा-तुम्ही तुमच्या बाळाला गुदगुल्या करता का? 6 महिन्यांपर्यंत ठरू शकतं घातक
दुर्लक्ष कराल तर होतील हे आजार
ंयात फुफ्फुसांमधील नसा ब्लॉक होण्याची शक्यता असते, जे घातक आहे. यासोबतच, हृदयविकारांचे प्रमुख (Heart disease during pregnancy) लक्षण हे छातीत दुखणेच आहे. प्रेग्नन्सीदरम्यान ब्लडप्रेशर, शुगर लेव्हल (BP and Sugar level in pregnancy) देखील सारखे कमी-जास्त होताना दिसून येतात. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.
गरोदरपणात महिलांना बऱ्याच गोष्टी खायला देतात. यामध्ये कित्येक वेळा प्रोटीन पावडरचाही समावेश असतो. काही वेळा युरिनमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढले, तर त्यामुळे रक्तदाब अचानक वाढू लागतो. हा प्रकार साधारणतः गरोदरपणाच्या 20व्या आठवड्यानंतर दिसून येतो. याकडे लक्ष दिलं नाही, तर प्री-एक्लेम्पसिया (preeclampsia) हा आजार होऊ शकतो. छातीत दुखणं (Chest pain in pregnancy) हे या आजाराचंही लक्षण आहे.
अशा प्रकारे घ्याल काळजी
गरोदरपणात घरी रक्तदाब (Blood pressure) तपासण्याचं मशीन ठेवाच. छातीत दुखू लागल्यास तातडीने रक्तदाब तपासा. रक्तदाब खूप जास्त किंवा खूप कमी असल्याचे दिसून आले, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. जर गॅसेसमुळे छातीत दुखत असेल, तर घरगुती उपचार (Home remedies for gases) करू शकता. गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे छातीत दुखत असेल, तर डाव्या कुशीवर झोपल्याने आराम मिळू शकतो. मात्र, घरगुती उपायांनंतरही त्रास सुरू राहिल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करणं गरजेचं आहे. यासोबतच डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य, योगासने आणि इतर व्यायाम प्रकार नियमित करत राहिल्यास असे धोके टाळता येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy