खतरनाक! 300 डिग्रीमध्ये जिवंत राहातो हा प्राणी, कोण आहे जाणून घ्या सविस्तर

खतरनाक! 300 डिग्रीमध्ये जिवंत राहातो हा प्राणी, कोण आहे जाणून घ्या सविस्तर

माणूस 50 डिग्री तापमानात सुद्धा राहू शकत नाही तिथे हा प्राणी 300 डिग्री तापमान देखील सहन करू शकतो.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर: जिथे माणूस 50 डिग्री तापमानात सुद्धा राहू शकत नाही तिथे हा प्राणी 300 डिग्री तापमान देखील सहन करू शकतो. हा प्राणी सजीव अवकाशातील थंड ठिकाणी आणि मरियाना ट्रेच सारख्या जबरदस्त दबावाखाली ही सहज जगू शकतो. गेल्या वर्षी केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की लवचिक लहान जीव न्युक्लिअर रेडिएशनमध्येही 35 तासापर्यंत चेर्नोबिलच्या ग्राउंड झिरो वर टिकू शकतात.

अल्ट्रा व्हॉयलेट रेडिएशनला विरोध करणाऱ्या 'पॅरामॅक्रोबायोटस' नावाच्या या जीवात भारतातील संशोधकांना एक नवीन जनुक सापडला आहे.‌ खरंच हा प्राणी एक संरक्षक कवच घेऊन जन्माला आला आहे तो हानिकारक किरणं शोषून घेतो आणि निळा प्रकाश बाहेर सोडतो.

भारतीय विज्ञान संस्थेचे बायोकेमिस्ट हरी कुमार सुमा यांनी आपल्या संशोधन पेपरात असे लिहिले आहे की आमच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पॅरामॅक्रोबायोटसचे नमुने UV प्रकाशाप्रमाणे न्युक्लिअर फ्लॉरोसन्स उत्सर्जित करतात. जे युवी प्रकाशाच्या प्राणघातक किरणांपासून Tardigrades चे संरक्षण करते. हरी कुमार यांच्या म्हणण्यानुसार हा जीव फ्लूरोसेंस सिस्टीम विकसित करण्यासाठी युव्ही रेजच्या सूचकांकापर्यंत पोहोचू शकतो.

हे वाचा-एका क्षणात होत्याच नव्हतं झालं; दाम्पत्याचा दुर्देवी अंत

संशोधकांच्या म्हणण्यानुसार रेडिएशन दरम्यान सामान्य जीव केवळ पंधरा मिनिटे टिकू शकतात. परंतु पॅरामॅक्रोबायोटसमुळे हे जीव केवळ स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम नाहीत तर किरणांचे शोषण केल्यावर स्वतःच्या आतून निळा प्रकाश देखील सोडण्यास सक्षम आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की ते या जीवातून पॅरामॅक्रोबायोटस काढून इतर जीवांमध्ये सुद्धा टाकू शकतात. अशा प्रकारे इतर जीवदेखील या धोकादायक किरणांपासून आपले संरक्षण करू शकतात.

तसेच अन्य देशातील तज्ञ हा अभ्यास अपूर्ण असल्याचे मानत आहेत. द गार्डियन शी बोलताना जीवशास्त्रज्ञ लुकास काझमारेक म्हणाले की हा अभ्यास आमच्या नुसार तरी आम्ही अपूर्ण समजतो कारण या प्राणघातक परिस्थिती स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असलेल्या या जीवांमधील वैशिष्ट्ये ही नैसर्गिक वातावरणामुळे आहेत की इतर कोणत्या कारणास्तव हे आम्हाला माहीत नाही. त्याचवेळी पोलंडमधील ॲडम मिक्युइझ विद्यापीठाच्या तज्ञांनी सांगितले की अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कुठला पदार्थ नेमका जबाबदार आहे याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार या जिवाणू मध्येही वैशिष्ट्ये प्रोटेक्टीव प्रोटीनमुळे आली असावी.

First published: October 23, 2020, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या