S M L

दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क नको, ते ओझं वाहून नेणारे नाहीत - मद्रास हायकोर्ट

दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणजेच गृहपाठ देऊ नका असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय.

Ajay Kautikwar | Updated On: May 30, 2018 06:06 PM IST

दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क नको, ते ओझं वाहून नेणारे नाहीत - मद्रास हायकोर्ट

चेन्नई,ता.30 मे: दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणजेच गृहपाठ देऊ नका असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. तसेच शाळेत त्यांच्यावर गणित आणि भाषा याशिवाय अन्य कोणत्याही विषयांची सक्ती करु नये असं देखील न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय.

तसंच तिसरी आणि चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना फक्त पर्यावरण हा अतिरिक्त विषय असावा, असेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आलंय.

सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सक्ती करावी अशी मागणी करणारी याचिका एम. पुरूषोत्तम यांनी केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान गृहपाठाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना दिलासा देणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय.

चांगलं शिक्षण देण्याच्या नावाखाली आता अगदी पहिलीपासून मुलांवर पुस्तकांचा मारा करण्यात येतो. त्या प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वही. वर्कबुक्स आणि इतर शालेय साहित्यामुळं मुलांचं दप्तर हे त्याची पाठ वाकवणारं असतं. मुलांची बुद्धी चौकस व्हावी त्यांना वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची सवय लागावी यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो.

काय म्हणालं मद्रास हायकोर्ट?

Loading...

  • मुलांना बालपणाचा आनंद पूर्णपणे लुटू द्या. तो त्यांचा अधिकारच आहे.

  • त्यांना कोणताही ताण देऊ नका. इयत्ता दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क देऊ नका.

  • मुले 'वेट लिफ्टर' नाहीत. त्यांची दफ्तरे मालवाहतूक करणारे कंटेनर नाहीत.

  • मुलांवर शिक्षणाचं ओझं लादू नका. मुलांना पुरेपूर झोप घेण्याचा अधिकार आहे.

  • घटनेच्या २१ व्या कलमात हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.

  • मुलांची झोप झाली नाही तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • मुले पाच वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातात पेन्सिल देऊ नये.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2018 06:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close