अयोध्येनंतर महाराष्ट्रावर फोकस, राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या 6 घडामोडी

अयोध्येनंतर महाराष्ट्रावर फोकस, राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या 6 घडामोडी

आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार आहे. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निकाल दिला आहे. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अद्यापही राज्यात सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही.

भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या सगळ्यानंतर अखेर विधानसभेचा कार्यकाळ संपला आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडे राज्याची धुरा देण्यात आली.

या सगळ्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. इतर बातम्या -

इतर बातम्या - फडणवीसांची परीक्षा: 18 अपक्ष आमदारांकडून पाठिंबा, सुधीर मुनगंटीवरांचा मोठा दावा

1)सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत भाजपला पुरेसं संख्याबळ म्हणजे 145 चा आकडा सिद्ध करावं लागेल.

2)राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. एकून 18 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून 22 आमदारांची गरज आहे. बहुमताचा हा आकडा कसा गाठायचा यावर उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करू अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

3)सत्ता स्थापन करण्याच्या लढाईमध्ये आता शिवसेनेतही मोठ्या हालचालींना वेग आला आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सेनेनं आपल्या आमदारांना मढ आयलँडवरील हॉटेल रिट्रीटमध्ये हलवण्यात आले आहे. सेनेच्या आमदाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील मढ बीचवर आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या - बुलबुल चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, मुंबईसह इतर शहरांत पावसाची शक्यता

4)काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे महाराष्ट्रातील बडे नेते हे जयपूरला रवाना झाले आहेत. तिथे काँग्रेसमध्ये मोठी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

5)राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये बहुमताचा आकडा कसा गाठायचा यावर चर्चा करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान, ज्यांच्याविरोधात आम्ही निवडणुका लढल्या त्यांच्याशी हातमीळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. तर बहुमतासाठी आता शिवसेनेनं पुढाकार घेणं महत्त्वाचं असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - BREAKING: वारकऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात

6) राजकीय घडामोडींमध्ये उदयनराजे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान आलं आहे. उदयनराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने आता भाजपच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

इतर बातम्या - क्षणात बाप-लेकराच्या आयुष्याला पुर्नविऱ्हाम, पोहताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या