• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • नवीन किंवा सेकंड हँड आयफोन खरेदी करताना 'हे' सेटिंग जरूर तपासा; अन्यथा होईल फसवणूक

नवीन किंवा सेकंड हँड आयफोन खरेदी करताना 'हे' सेटिंग जरूर तपासा; अन्यथा होईल फसवणूक

सेकंड हँड आयफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती जाणून घेऊ या.

  • Share this:
बऱ्याच लोकांना सतत मोबाइल फोन (Mobile Phone) बदलण्याची सवय असते. तुम्हीही नवीन किंवा सेकंड हँड आयफोन (Second Hand iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याविषयी काही गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सेकंड हँड फोन खरेदी करणं तसंही धोकादायक असतं. कारण त्या फोनबद्दल आपल्याकडे पूर्ण माहिती नसते. मार्केटमध्ये सेकंड हँड आयफोनचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. आपल्याकडे त्याविषयी योग्य ज्ञान नसल्यास तुम्हाला असे फोन खरेदी करण्यासाठी कदाचित जास्त रक्कमही चुकवावी लागू शकते. सेकंड हँड आयफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती जाणून घेऊ या. सेटिंग्जमध्ये (Settings) जाऊन हे तपासा सेकंड हँड आयफोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आयफोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. सेटिंग्जमधील अबाउट फोनमध्ये (About Phone) जावं लागेल. येथे तुम्हाला फोनचा मॉडेल नंबर (Model Number) दिसेल. तिथे तुम्हाला समजू शकेल की आपला फोन कोणत्या कॅटेगरीमधील आहे. सीरिजमध्ये असणाऱ्या सुरुवातीच्या अक्षरांचा अर्थ जाणून घ्या. आपल्या iOS डिव्हाइसमध्ये (Device) सेटिंग्ज ॲप उघडा. लिस्टमध्ये जनरल (General) टाइप करा लिस्टच्या वरती असणाऱ्या पर्यायाबद्दल (option) टाइप करा. आपल्या डिव्हाइसचं मॉडेल नंबरच्या (Recognizer Model Number) पुढे दिसेल. हे वाचा - तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? असा करा रिकव्हर, जाणून घ्या सोपी ट्रिक सेटिंग्जमध्ये दिसणार्‍या अक्षरांचा अर्थ M - हा रिटेल फोन आहे, जो नवीन असतानाच (Brand New) खरेदी केलेला आहे. F - हे डिव्हाइस पूर्वी वापरलेलं होतं; मात्र ॲपलकडून (Apple) त्याला 'नव्यासारखं' बनविण्यासाठी ॲपलच्या सर्टिफाइड रीफर्बिश्ड (certified refurbished) प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. अविश्वासार्ह विक्रेते अशी डिव्हाइसेस पूर्ण किमतीत नवीन डिव्हाइस म्हणून विकू शकतात आणि पूर्ण किंमत वसूल करू शकतात. म्हणून असे रीफर्बिश्ड आयफोन आणि आयपॅड्सपासून (iPad) सावध राहा. N - मालकाला हे डिव्हाइस मूळ खरेदी केलेल्या युनिटच्या बदल्यात Apple सर्व्हिस रिक्वेस्टद्वारे मिळालं आहे. P - हे एक नवीन रिटेल डिव्हाइस आहे. ते ऑनलाइन ऑर्डर केलं गेलं होतं. सोबतच चेकआउटच्या वेळी Apple चा कस्टम लेजर एनग्रेविंग ऑप्शन (custom laser engraving) दिला गेला होता. टेक्निकल एक्पर्ट (Technical Expert) आकाश हजारे यांच्या म्हणण्यानुसार, मार्केटमध्ये आयफोनची इम्पोर्टेड व्हर्जनसुद्धा (Imported Version) आहेत. अशा प्रकारचे फोन खरेदी करणं टाळावं. कारण काही काळानंतर ते लॉक केले जाऊ शकतात. हे फोन कदाचित चोरीचेसुद्धा असू शकतात. कंपनीला तसं आढळून आल्यास कंपनी ते फोन लॉक करते. एकदा का हा फोन लॉक झाला की, त्याचा वापर करता येत नाही. या फोनची विक्री करणारे त्याचं बिल देत नाहीत. त्यामुळे त्याची वॉरंटीसुद्धा मिळत नाही.
First published: