खिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर

तुम्हाला परदेशात फिरायची आवड असेल पण खिसा तेवढा भरलेला नसेल तर नाराज व्हायचं काही कारण नाही. आम्ही तुमच्या स्वस्त परदेश दौऱ्यांसाठी एक यादी तयार केली आहे. हे असे देश आहेत की जिथे आपल्या रुपयाला किंमत आहे. या देशांपैकी काही देशांत एक रुपयाची किंमत 338 रुपये आहे तर काही देशात 100 रुपयाची किंमत आहे 5 हजार 935 रुपये.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 07:22 PM IST

खिसा गरम नसला तरीही तुम्ही करू शकता या देशांची सफर

व्हिएतनाम : समुद्राने वेढलेला हा छोटासा देश दक्षिण आशियामध्ये येतो. समुद्रकिनारे, सरोवरं आणि जंगल सफारीसारखे अनेक पर्याय इथे आहेत. हनोई, हो चि मिन्ह, सापा, हॅलाँग बेस नहा तरांग, मेकोंग डेल्टा, वॉर मेमोरियल ही इथली काही पर्यटन स्थळं. व्हिएतनामी डोंग हे इथलं चलन आहे. इथे एक रुपयाच्या बदल्यात 338 व्हिएतनामी डोंग मिळतील.

भूतान : जगातला सगळ्यात सुखी देश. भारतीयांसाठी इथे जायला पासपोर्टचीही गरज नाही. थिंपू, टायगर नेस्ट मोनॅस्ट्री, पुनाखा जोंग, दोचुला पास, पुनाखा ही इथली पर्यटन स्थळं आहेत. भूतानमध्ये एक रुपयाची किंमत दीड रुपयांपर्यंत जाते. पारो हे भूतानमधलं एकमेव विमानतळ आहे. इथे कोलकात्याहून विमानांची जास्त उड्डाणं होतात.

श्रीलंका : हिंदी महासागरातलं हे बेट भारतापासून केवळ 3 तासांच्या अंतरावर आहे. भारतातून दरवर्षी सुमारे 2 लाख पर्यटक श्रीलंकेला जातात. कोलंबो, कँडी हिल स्टेशन ही इथली आकर्षणाची ठिकाणं. केरळमधल्या कोचीहून कोलंबोसाठी थेट विमानं आहेत. एक ट्रेनही आठवड्यातून एकदा चेन्नईहून श्रीलंकेला जाते. इथे भारतीय रुपयाची किंमत 256 रुपये आहे.

 इंडोनेशिया : बाली हे इंडोनेशियामधलं सर्वात सुंदर शहर आहे. हा देश तिथल्या पवित्र सौंदर्यासाठी ओळखला जातो. बालीच्या शिवाय टोबा, जकार्ता, मलंग, लोंबोक अशी ठिकाणं इथे आहेत. एका भारतीय रुपयाची किंमत 202 रुपये आहे. भारतातून तुम्ही विमानाने सव्वाआठ तासांत बालीला पोहोचता.

कंबोडिया : व्हिएतनामजवळचा हा देश हिंदू आणि बौद्ध साम्राज्य असलेला प्रभावी देश होता. इथे अंगरोकवाटमधलं सर्वात मोठं मंदिर आहे. सिल्व्हर पॅगोडा, बायोन मंदिर, तोनले साप ही पर्यटन स्थळंही प्रसिद्ध आहेत.  एका भारतीय रुपयाची किंमत कंबोडियामध्ये 5 हजार 935 रुपये होते. भारतातून कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह इथे पोहोचण्यासाठी सुमारे 5 तास लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...