ठाणे खंडणी वसुली गुन्ह्यात छोटा शकीलही आरोपी !

ठाणे खंडणी वसुली गुन्ह्यात छोटा शकीलही आरोपी !

ठाण्यातल्या बिल्डर खंडणी वसूली प्रकरणी, इक्बाल कासकरसोबतच आता छोटा शकील यालाही आरोपी करण्यात आलंय. छोटा शकील हा दाऊद इब्राहिम कासकरचा उजवा हात मानला जातो. खंडणी वसुलीच्या या गुन्ह्यात छोटा शकीलचं नावं पुढे आल्यानं या प्रकरणातलं 'डी' गँग कनेक्शन नव्याने समोर आलंय.

  • Share this:

ठाणे, 27 सप्टेंबर : ठाण्यातल्या बिल्डर खंडणी वसूली प्रकरणी, इक्बाल कासकरसोबतच आता छोटा शकील यालाही आरोपी करण्यात आलंय. छोटा शकील हा दाऊद इब्राहिम कासकरचा उजवा हात मानला जातो. खंडणी वसुलीच्या या गुन्ह्यात छोटा शकीलचं नावं पुढे आल्यानं या प्रकरणातलं 'डी' गँग कनेक्शन नव्याने समोर आलंय.

इक्बाल कासकर मुंबई आणि ठाण्यात चालवत असलेल्या खंडणी वसूली व्यवसायाचा म्होरक्या हा पाकिस्तानात बसलेला छोटा शकील असल्याचं पोलीस तपासात पुढं आलंय. त्यामुळं छोटा शकीलला या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलंय. पाकिस्तानात बसून छोटा शकील मुंबईतला हा व्यवसाय इक्बाल कासकरमार्फत कंट्रोल करतो. इक्बाल कासकर आणि त्याचे साथीदार छोटा शकीलसाठीच खंडणीचं काम करत होते. आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत इक्बाल कासकरनं अनेक खुलासे केलेत. या खंडणी प्रकरणानंतर आणखी काही गुन्हेही समोर आलेत. तसंच चौकशीत इक्बालनं काही नावं सांगितली आहेत. त्यातले काहीजण मुंबईतले तर दोन व्यक्ती बिहारच्या असल्याचं सांगितलं जातंय. त्यांना बिहारमधून मुंबईत आणणं आणि इतर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी आणखी वेळ लागेल यासाठी ठाणे पोलिसांनी आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मागून घेतली. आणि कोर्टानं ती मंजूरही केलीय.

खंडणी मागण्यासाठी आणि लोकांना धमकावण्यासाठी बिहारमध्ये असलेल्या शम्मूी आणि गुड्डू या शुटर्सचीही मदत घेतली जात होती. या शुटर्सना लागणारा पैसा हा बोरिवलीचा एक मटका व्यापारी पुरवत असल्यची माहीती आहे. बिहारमध्ये काही गुन्हा केला कि हे शुटर मुंबईत यायचे, मुमताज त्यांना सहारा द्यायचा. आणि इथल्या लोकांना धमकावण्यासाठी त्यांचा वापर करुन घ्यायचा. या शुटर्सना पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचची एक टिम बिहारला गेलीेये. तिथं या दोघांना पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची मदत घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 07:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading