News18 Lokmat

विमानप्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, 1 एप्रिलपासून होणार 'हा' मोठा बदल

चेक इन काऊंटरवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 12:41 PM IST

विमानप्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, 1 एप्रिलपासून होणार 'हा' मोठा बदल

मुंबई, 28 मार्च : आता 1 एप्रिलपासून विमानानं प्रवास करणं सोपं होणार आहे. विमानतळावर त्वरित चेकिंगसाठी नवी सुविधा सुरू होतेय. याची सुरुवात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ टर्मिनल 2 मध्ये सुरू होतेय. इथून गोएअर, इंडिगो आणि स्पाइसजेटची भारतातली विमानं उड्डाण घेतात. त्यानंतर टर्मिनल 1, टर्मिनल 3 वरही ही सेवा सुरू केली जाईल.

या प्रवाशांना मिळणार सेवा

या सेवेत प्रवासी चेकइन भागात प्रवेश न करताच सरळ बोर्डिंगच्या इथे जाऊ शकतात. यात प्रवाशांना चेकइनमध्ये मदत मिळून सिक्युरिटी चेकिंग करावं लागेल. याचा नेहमी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना खूप उपयोग होईल.

प्रवाशांचा वेळ वाचेल

टाइम्स आॅफ इंडियाच्या माहितीनुसार चेक इन काऊंटरवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेक इन काऊंटरवर खूप गर्दी असते. म्हणूनच हा निर्णय घेतलाय. हळूहळू इतर शहरांच्या विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीत 40 टक्के प्रवासी चेक इन बॅगा न घेता प्रवास करत असतात.

Loading...

2017मध्ये हैदराबाद विमानतळावर ही सेवा सुरू केली होती. दिल्ली विमानतळावरच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी डिपार्चल टर्मिनल एन्ट्रीवर जागा तयार केली आहे.

सध्या अनेक विमान कंपन्या तोट्यात सुरू आहेत. त्यांची भवितव्य धोक्यात आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेली ‘जेट एअरवेज’ कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सध्या कंपनीवर 1 अब्ज रूपयांपेक्षा देखील जास्त कर्ज आहे. तर, कंपनीच्या ताफ्यातील केवळ 41 विमानांची उड्डाणं सध्या सुरू आहेत. इतर कंपन्यांशी स्पर्धा, घसरता रुपया आणि इंधनाचे वाढते दर यामुळे कंपनीला आता अनेक उड्डाणं रद्द करावी लागत आहेत.


VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...