चांद्रयान - 2 च्या लँडिंगची धाकधुक वाढली, इस्रोने असा केला होता सराव

चांद्रयान - 2 च्या लँडिंगची धाकधुक वाढली, इस्रोने असा केला होता सराव

इस्रोने याआधी चांद्रयान - 2 सारखी महत्त्वाकांक्षी मोहीम पार पाडली नव्हती. त्यामुळे हे लँडिंग यशस्वी करून दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. लँडिंगची शेवटची 15 मिनिटं इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी कसोटीची आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : अवघ्या जगाचं लक्ष आता चांद्रयान - 2 च्या लँडिंगकडे लागलं आहे. चांद्रयान - 2 चं लँडिंग हे चांद्रयान - 1 च्या तुलनेत सुरळित होईल, अशी खात्री एम. अण्णादुराई यांना आहे. एम. अण्णादुराई हे चांद्रयान - 1 मोहिमेचे मिशन डायरेक्टर होते.

चांद्रयान -2 च्या लँडिंगला आता अवघे काही तास राहिले आहेत. अशा वेळी त्यांना चांद्रयान -1 चं लँडिंग आठवतं. ते सांगतात, चांद्रयान -1 चंद्राच्या कक्षेत स्थिरावताना त्याला अपघात झाला होता. ते क्रॅश लँडिंग होतं. आता मात्र सॉफ्ट लँडिंगची तयारी झाली आहे. चांद्रयान -2 च्या लँडिंगचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अनेक वेळा सराव करण्यात आला होता. चांद्रयान -2 चं लँडिंग मोड्युल असलेलं विक्रम लँडर 'प्रज्ञान' रोव्हरला घेऊन रात्री 1:30 ते 2:30 या काळात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चंद्रावर उतरल्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल. ही वेळ आहे 5:30 ते 6: 30 ची.

शेवटची 15 मिनिटं

इस्रोने याआधी असा कोणताही प्रयोग केला नव्हता. त्यामुळे शेवटची 15 मिनिटं खूप महत्त्वाची असणार आहेत. याआधी अमेरिका, रशिया, चीन या 3 देशांनी चंद्रावर यान उतरवलं होतं. पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 70 विद्यार्थ्यांसह इस्रोच्या बंगळुरू केंद्रात चांद्रयानचं लँडिंग पाहणार आहेत.

भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

नॅशनल जिओग्राफिकने मंगळवारी जाहीर केलं आहे की, चांद्रयान -2च्या लँडिंगचं विशेष थेट प्रक्षेपण करून ते आपल्या प्रेक्षकांना ऐतिहासिक अनुभव देणार आहेत. 6 सप्टेंबर, 2019 ला रात्री 11:30 वाजल्यापासून हा कार्यक्रम नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. हॉटस्टारचे युझर्ससुद्धा हे लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकतात.

====================================================================================================

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत; काय म्हणाले छगन भुजबळ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading