श्रीहरीकोटा15 जुलै : भारताचं महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 काही तासात आकाशात झेपावणार आहे. त्यासाठी भारताची अंतराळ संशोधन संस्था ISRO गेली काही वर्ष प्रचंड मेहनत घेतेय. रशियाने सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर अनेक अडचणींवर मात करून भारतीय शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहन, संशोधन आणि कामावरच्या अपार श्रद्धेच्या बळावर हे मिशन पूर्ण केलंय. यानाच्या उभारणीसाठी जे काही कष्ट करावे लागले, पडद्यामागे असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याचा खास व्हिडिओ ISROने तयार केलाय.