Chandrayaan-2: इस्त्रोने देशवासियांचे मानले आभार; म्हणाले, सगळी स्वप्न पूर्ण करणार

Chandrayaan-2: इस्त्रोने देशवासियांचे मानले आभार; म्हणाले, सगळी स्वप्न पूर्ण करणार

चांद्रयान-2 च्या केवळ 5 टक्के मिशनवर परिणाम झाला आहे. 95 टक्के मिशन यशस्वी झालं आहे. 5 टक्के भागामध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे, चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती उपलब्ध होणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) चंद्रयान 2 साठी देश आणि जगाकडून मिळालेल्या समर्थनासाठी आभार मानले आहेत. चंद्रावर उतरण्यापूर्वी लॅन्डर विक्रम गमावल्यानंतरसुद्धा ज्या प्रकारे संपूर्ण देशाने इस्रोच्या शास्त्रज्ञांना धैर्य दिलं, त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना मोठं प्रोत्साहन मिळालं आहे. जगभरातून पाठिंबा मिळाल्यानंतर इस्रोने आता ट्विट करुन सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत. या ट्विटद्वारे अवकाश विज्ञान जगतात भारताला अभिमान मिळवून देण्याऱ्या या संघटनेने जगभरात प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न साकार करण्याचं आश्वासन दिलं आहे.

इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आमचे समर्थन केल्याबद्दल धन्यवाद. जगभरातील भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांवर आपण पुढे जात राहू. हे लक्षात घेण्यासारखं आहे की चंद्रयान -2 लँडर विक्रम सप्टेंबरच्या मध्यभागी चंद्रच्या पृष्ठभागावर उतरणार होता, परंतु लँडर विक्रम चंद्रापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर पडला.'

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, चांद्रयान-2 च्या केवळ 5 टक्के मिशनवर परिणाम झाला आहे. 95 टक्के मिशन यशस्वी झालं आहे. 5 टक्के भागामध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे, चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती उपलब्ध होणार नाही. परंतु, मिशनच्या इतर 95 टक्के सक्रिय भागातून अनेक प्रकारची माहिती मिळत राहील. चंद्रयान-2 ची कक्षा सतत चंद्राभोवती फिरत राहील आणि त्याद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांना माहिती मिळेल. मिशन चंद्रयान 2 ची कक्षा पुढील एक वर्ष काम करत राहील. ऑर्बिटर चंद्राची अनेक प्रकारची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवेल.

इतर बातम्या - PM मोदींना भेटण्यापूर्वी पत्नी जशोदाबेन यांची ममतांसोबत पडली गाठ आणि...!

'विक्रम'च्या शोधात असलेल्या NASA च्या ऑर्बिटरनं टिपलेत पावलांचे ठसे!

भारताचा चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्त्रोकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आता अमेरिकनं अंतराळ संस्था नासाची मदत यासाठी घेण्यात येणार आहे. नासाच्या ऑर्बिटरने याआधी अत्यंत सूक्ष्म अशा बाबी टिपल्या आहेत. त्याच्या आधारे विक्रम लँडरबद्दलची माहिती घेऊन त्याच्यावर पुढं काय करायचं हे इस्त्रो ठरवणार आहे.

नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत भारताच्या ऑर्बिटरपेक्षा जास्त जवळून फेरी मारतो. त्याने टिपलेल्या फोटोंमधून भारताच्या विक्रम लँडरचा तपशील मिळेल. नासाने 2009 मध्ये चांद्र मोहिम केली होती. त्यात अॅटलस व्ही रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या ऑर्बिटरनं चंद्रावरील खनिज, साधनसंपत्ती यांची ठिकाणं भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमा आखण्यासाठी कोणती जागा योग्य याची माहिती घेतली. जवळपास एक वर्ष त्याची मोहिम सुरू होती.

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर दोन दिवसांनी एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यात विक्रम चंद्रावर उतरल्याचं म्हटलं जात होतं. पण तो फोटो नासाच्या ऑर्बिटरने काढलेला होता. यात 40 वर्षांपूर्वी अपोलो मिशन ज्या जागी झाली तिथला फोटो होता. त्यात चंद्रावरच्या मानवाच्या पावलांचे ठसेही दिसत होते.

इतर बातम्या - 'नाणार' पुन्हा येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर!

नासानेच हा फोटो शेअऱ केला होता. पावलांचे ठसे टिपणाऱ्या या ऑर्बिटरची मदत आता विक्रम लँडरची माहिती व्हावी यासाठी घेण्यात येणार आहे.

17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जिथं विक्रम लँडर आहे तिथून जाणार आहे. त्याचे फोटो ऑर्बिटर घेऊन इस्त्रोला पाठवणार आहे. तेव्हा विक्रमची नेमकी स्थिती काय याची माहिती होणार आहे. नासा त्यांचे सर्व फोटो आणि माहिती संकेत स्थळावर अपडेट करते. विक्रमचे फोटो काढल्यानंतर तेसुद्धा इस्त्रोला पाठवले जातील.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

Published by: Renuka Dhaybar
First published: September 18, 2019, 8:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading