भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र या - चंद्रशेखर आझाद

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र या - चंद्रशेखर आझाद

भाजप सत्तेच्या जोरावर आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Share this:

अमरावती, 4 जानेवारी : भाजप आणि सध्याचं केंद्र सरकार हे घटना विरोधी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेला त्यांच्यामुळे धोका निर्माण झालाय. त्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या माणसांना न्याय देण्यासाठी एकत्र या असं आवाहन भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेख आझाद यांनी केलं आहे. अमरावतीत शुक्रवारी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कोरेगाव भीमात सभा घेण्याचा आग्रह धरत आझाद यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आज अमरावतीत सभा घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. आझाद म्हणाले, "ओबीसी, मुस्लिम,दलित आदिवासी हे एकत्र आल्याशीवाय सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत. भाजप सत्तेच्या जोरावर आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे."

शिक्षण, आरोग्य, न्याय अशा गोष्टी मोफत देणारं सरकार देशाला पाहिजे आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा घटनेवर विश्वास नाही त्यांना मनूचं राज्य आणायचं आहे असा आरोपही त्यांनी केला. अशा पक्षांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं.

भाजपने लोकांना भुलथापा देऊन फसवलं आहे. मात्र त्यांच्या खोट्या घोषणांना आता बळी पडू नका असंही ते म्हणाले. आझाद यांची उत्तर प्रदेशात संघटना असून ते महाराष्ट्रात आपला विस्तार करण्यासाठी प्रययत्न करत आहेत. कोरेगाव भीमाचं निमित्त करून त्यांचा राज्यात संघटना विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.

दादरच्या रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या असं अशी मागणी त्यांनी केली.त्यासाठी आंदोलन करू असंही त्यांनी जाहीर केलं. प्रत्येक 1 जानेवारीला भीमा कोरेगावला येईल असंही ते म्हणाले.

 

 

Special Report : मोदी, मंदिर आणि संघ : लोकसभेच्या रणांगणात रामाची परीक्षा

First published: January 4, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading