झुंज संपली! दगडाच्या कपारीत अडकलेल्या वाघाची मृत्यूने केली सुटका

झुंज संपली! दगडाच्या कपारीत अडकलेल्या वाघाची मृत्यूने केली सुटका

पुलावर दोन्ही बाजूंनी दोनं वाहनं आल्याने वाघ गोंधळला आणि त्याने खडकाळ नदीपात्रात उडी मारली होती

  • Share this:

चंद्रपूर, 07 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिरणा नदीपात्रात दगडाच्या फटीत अडकलेल्या वाघाचा दुर्दैर्वी मृत्यू झाला. वनविभागाच्या बचावपथकाने शर्थीचे प्रयत्न करून वाघाला फटीतून काढण्याचा प्रयत्न केला. अंधार झाल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी या वाघाचा मृतदेह आढळला.

घडलेली हकीकत अशी की, मंगळवारी शिरणा नदीच्या अरुंद पुलावर हा वाघ आला होता. पहाटेच्या वेळी अचानक दोन्ही बाजूंनी दोनं वाहनं आल्याने वाघ गोंधळला आणि त्याने खडकाळ नदीपात्रात उडी मारली. याच क्षणी त्याच्या शरीराला जखमा झाल्या. जायबंद झाल्यामुळे हा वाघ एक दगडाच्या कपारीत आडकला होता.

वाघ अडकल्याची बातमी कळताच पाहण्यासाठी लोकांनी तोब गर्दी केली होती. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने काढण्याचे प्रयत्न झाले मात्र त्याने पिंजऱ्यावर हल्ला केल्याने त्याच्या जबड्याला जखमा झाल्या.

बुधवारी रात्री अंधार झाल्याने वाघाचे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. तर आज सकाळी बचावकार्य सुरू होण्याआधीच वाघाचा निपचित देह बचाव पथकाला दिसला. वन अधिकाऱ्यांनी या वाघाची तपासणी केला असता तो मृत झाल्याचं कळलं. वाघाला अंतर्गत रक्तस्त्राव होऊन इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असं वनअधिकाऱ्यांनी सांगितलं.

त्यानंतर वनाधिकारी आणि वन्यजीव संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वाघाच्या मृतदेहावर उपचार केंद्र परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या