Home /News /news /

लॉकडाउनमुळे घरी अडकलेल्या भाजप नेत्याच्या भावाकडून भीषण कृत्य, चंद्रपूर हादरलं!

लॉकडाउनमुळे घरी अडकलेल्या भाजप नेत्याच्या भावाकडून भीषण कृत्य, चंद्रपूर हादरलं!

जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या हत्याकांडाने परिसर हादरून गेला.

  हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 29 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. लॉकडाउनमुळे अनेक राज्यात मजूर अडकले आहे. तर नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आहे. परंतु, घरीच अडकल्यामुळे एका भाजप नेत्याच्या भावाची मानसिक स्थिती बिघडली आणि त्यातून त्याने मुलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या हत्याकांडाने परिसर हादरून गेला. ज्येष्ठ भाजप भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली. या नेत्याच्या भावाने स्वतःच्या 2 मुलांना घरगुती भांडणानंतर रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. हेही वाचा - 3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे?आज निर्णय होण्याची शक्यता मुलांवर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. या गोळीबारानंतर रुग्णालयात नेताना एका मुलाचं निधन झालं  तर दुसरा मुलगा अत्यवस्थ आहे. चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपुरात  हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तसंच नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली. मृतक वडील मूलचंद द्विवेदी हे एका रोकड वाहतूक करणाऱ्या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. लॉकडाउन दरम्यान त्यांची मानसिक स्थिती बरी नसल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तसंच, लॉकडाउनमुळे आर्थिक चणचणही त्यांना भासू लागली होती. त्यामुळे मूलचंद द्विवेदी चिंतातूर झाले होते. हेही वाचा - अमेरिका हादरलं! वृद्धाश्रमात पडला मृतांचा खच, 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू मूलचंद द्विवेदी हे  भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांचे भाऊ होते. ते त्यांच्या घरीच वरच्या माळ्यावर वास्तव्याला होते. मूलचंद द्विवेदी हे उत्तर प्रदेशात गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांचे आणि मुलांचे कडाक्याचं भांडण झालं. त्यातूनच मूलचंद द्विवेदी यांनी मुलांना गोळ्या घातल्या. नंतर स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. संपादन - सचिन साळवे

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: BJP, Chandrapur

  पुढील बातम्या