Elec-widget

चंद्रपुरात बिबट्याचा धुमाकूळ, दहशतीमुळे गावात भयाण शांतता

चंद्रपुरात बिबट्याचा धुमाकूळ, दहशतीमुळे गावात भयाण शांतता

बिबट्याला जेरबंद करण्याचे वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न

  • Share this:

महेश तिवारी (प्रतिनिधी) चंद्रपूर, 11 जून: चंद्रपुरात दिवसेंदिवस बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्यानं नागरिकांची चांगलीच झोप उडाली आहे. संध्याकाळी 7 नंतर चंद्रपुरात गडबोली गावात भीतीमुळे भयाण शांतता पसरते.

गडबोली गावात 9 महिन्याच्या बाळासह वयोवृद्ध महिलेचा बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर गावकरी प्रचंड दहशतीत आहेत.राञी बिबटया कोणत्या घरात घुसेल याचा नेम नसतो. त्यामुळे गावात दहशत आहे. बिबट्याच्या भीतीमुळे त्याला शोधून जेरबंद करणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेत. बिबट्याचा शोध घेतला जातो आहे. रात्री आणि दिवसाही बिबट्याची भीती पाहायला मिळते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. तर दुसरीकडे तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...