तरुण पित्यासह 6 वर्षीय मुलीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू, गावावर शोककळा

तरुण पित्यासह 6 वर्षीय मुलीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू, गावावर शोककळा

तरुण पित्यासह त्याची चिमुकली मुलगी या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

  • Share this:

हैदर शेख, चंद्रपूर, 4 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सिंधी या गावी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिंधी ते विरुर दरम्यान असणाऱ्या स्वत:चे शेतातील वीज पंप सुरू करायला गेलेल्या स्वप्नील सत्यपाल चहारे आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी या दोघांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे.

स्वप्नील चहारे हे सिंधी ते विरुर दरम्यान असलेल्या नाल्याजवळील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी निघाले. इतक्यात लहान मुलगी शेजलने धावत येऊन सोबत येण्याचा आग्रह केल्याने दोघेही मिळून शेतात पोहोचले. मात्र वीज पंपात जिवंत विद्युत प्रवाह असल्याने तो सुरू करताच जोरदार शॉक बसला. यावेळी सोबत असलेल्या मुलीसह वडील स्वप्नील चहारे यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - धक्कादायक : पाकिस्तानच्या हेरगिरीचे नाशिक कनेक्शन समोर, पोलिसांनी केली आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह विरुर पोलीस घटना स्थळी पोहोचले. चहारे कुटुंबात शेजल एकुलती एक मुलगी होती.  मृतक स्वप्नील याच्या पश्चात पत्नी आणि म्हातारे वडील आहेत. एका तरुण पित्यासह त्याची चिमुकली मुलगी या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील या घटनेने शोक व्यक्त होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 12:30 AM IST

ताज्या बातम्या