'मंत्री महोदय येता, खड्डे बुजवा पटापटा', दोन तासांत महामार्ग चकाचक

मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गाड्यांचा ताफा खेड भरणानाका येथे रोखण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 04:32 PM IST

'मंत्री महोदय येता, खड्डे बुजवा पटापटा', दोन तासांत महामार्ग चकाचक

कोल्हापूर, 31 आॅगस्ट : खड्य्यांची डेडलाईन देऊनही महाराष्ट्र खड्यात गेल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना खड्डे पाहण्याची आठवण झालीये. आज मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असताना या महामार्गाची पाहणी करण्यासाठी चंद्रकांत पाटील पोहोचले खरे पण ते येणार म्हणून अवघ्या दोन तासांपूर्वीच प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असताना या महामार्गाच्या पहाणी करीत आज अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई गोवा महामार्गावर आले आहेत. आज सकाळपासून चंद्रकांत पाटील यांनी महामार्गाच्या अवस्थेची पाहणी सुरू केल्यावर प्रशासनासह ज्या खाजगी कंपन्यांवर या महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच हा महामार्ग वाहतुकीस योग्य ठेवायची जवाबदारी आहे या कंपन्यांची एकच धावपळ सुरू झाली. गेले अनेक दिवस मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण शहरात अयोध्या हॉटेल काही भागात मोठे खड्डे होते. अनेक वेळा यात वाहनचालकांच्या गाड्या आपटत होत्या. पण तरीही खड्डे बुजवले जात नव्हते. आज मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील महामार्गावर पाहणीसाठी येताच या कंपन्यांची धावपळ सुरू झाली अवघ्या दोन तासांपूर्वी खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. गेले अनेक महिने न बुजवले चिपळूण मधील हे रस्ते आता बुजवायच्या कामाला सुरुवात झाली.

राष्ट्रवादी-मनसेनं अडवला चंद्रकांत दादा पाटलांचा ताफा

मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गाड्यांचा ताफा खेड भरणानाका येथे रोखण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जोरदार घोषणा देत बांधकाम मंत्रांचा रस्ता आडवला. ताफा आडवताच आंदोलकांनी बांधकाम मंत्र्यांच्या गाडी भोवती घेराव घातला. यानंतर चंद्रकांत दादा पाटील खाली उतरून आंदोलकांना सामोरं गेले. आमदार संजय कदम नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी महामार्गाच्या व्यथा मंत्र्यांसमोर मांडल्या. मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बांधकाम मंत्र्यांना दहा मिनिटे रस्त्यावर चालून दाखवा असा आग्रह धराला. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर खेड पोलिसांनी आंदोलकांना दूर हटवट बांधकाम मंत्र्यांच्या ताफ्या करता मार्ग मोकळा केला. यानंतर मंत्र्यांचा ताफा रवाना झाला.

रास्ता रोको

Loading...

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा आज मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर खेड मधील भरणे नाका इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने रास्ता रोको केला. यावेळी त्यांनी महामार्ग राखून धरत युती सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...