राणेंसाठी PWD खातं सोडू, असं मी बोललोच नव्हतो ! - चंद्रकात पाटील

नारायण राणे भाजपात आले तर त्यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार आहोत, असं मी कधी बोललोच नव्हतो, माझ्या त्या विधानाचा विपर्यास केला गेला. अशा दावा आता चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2017 05:39 PM IST

राणेंसाठी PWD खातं सोडू, असं मी बोललोच नव्हतो ! - चंद्रकात पाटील

पुणे, 22 सप्टेंबर : नारायण राणे भाजपात आले तर त्यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार आहोत, असं मी कधी बोललोच नव्हतो, माझ्या त्या विधानाचा विपर्यास केला गेला. अशा दावा आता चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सरळ कानावर हात ठेवले. राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपच्या कोअर कमिटीत अद्यापतरी कोणतीही चर्चा झालेली नाही. समजा त्यांना भाजपात घ्यायचेच असेल तर यासंबधीचा निर्णयही मी नाहीतर अमित शहा आणि मुख्यमंत्रीच घेतील. त्यासंबंधीचे मला कोणतेही अधिकार नाहीत, असं सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या या खुलाशामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

दरम्यान, यंदा कोल्हापूर भागात चांगला उतारा असलेल्या उसाला 3250रुपयांचा एफआरपी दर मिळू शकतो, असा अंदाजही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. १५ ऑक्टोबरपर्यंत एक तरी जिल्हा कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...