Home /News /news /

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार - चंद्रकांत पाटील

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार - चंद्रकांत पाटील

नारायण राणे भाजपात आले तर त्यांच्यासाठी मी माझे सार्वजनिक बांधकाम खातंही सोडायला तयार आहे. असं सूचक वक्तव्य प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

सांवतवाडी, 20 ऑगस्ट : नारायण राणे भाजपात आले तर त्यांच्यासाठी मी माझे सार्वजनिक बांधकाम खातंही सोडायला तयार आहे. असं सूचक वक्तव्य प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पण नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अजून ठरलेला नाही. असं सांगायलाही ते विसरले नाहीत. राणे भाजपात आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करु, पण त्यांच्या पक्ष प्रवेशाचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहाच घेतील असंही चंद्रकांत पाटलांनीच म्हटलंय. राणे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते पक्षात आले तर आम्हाला त्यांचा फायदाच होईल. असंही पाटलांनी म्हटलंय. दरम्यान, नितेश राणेंनी आपल्या व्हॉट्सअप डीपीवर आतापासूनच 'नारायण राणेच आमचा पक्ष' असा सूचक फोटो टाकलाय. विशेष म्हणजे नारायण राणेंच्या या फोटोमागे भगव्या रंगाची हलकीशी शेड आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधान आलंय. राणे समर्थकांकडूनही सोशल मीडियावर हाच फोटो शेअर केला जातोय. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशासाठी ही वातावरण निर्मिती तर सुरू नाहीना, अशीही राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, राणेंच्या भाजप प्रवेशासाठी 27 ऑगस्ट ही तारीख निश्चित झाल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. पण त्याला अधिकृत दुजोरा कोणीच दिलेला नाही.
First published:

Tags: Chandrakant patil, Narayan rane, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, नितेश राणे

पुढील बातम्या