• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा

भाजपचे राज्यातील 2 नंबरचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेत. या भेटीत विधान परिषद पोट निवडणुकीसाठीचा उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे.

  • Share this:
23 नोव्हेंबर, मुंबई : भाजपचे राज्यातील 2 नंबरचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेत. या भेटीत विधान परिषद पोट निवडणुकीसाठीचा उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे येत्या ७ डिसेंबरला रिक्तं झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या रिक्त जागेसाठी एनडीए मध्ये नव्याने दाखल झालेले नारायण राणे यांनाच भाजप उमेदवारी देणार का...? जर भाजपने नारायण राणे यांनाच उमेदवारी दिली तर शिवसेना पाठिंबा देणार नाही. हे उघड आहे. अशातच विजयासाठी १४५ हे संख्याबळ गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेचा पाठींबा आवश्यक आहे. मात्र, नारायण राणे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे. विधानसभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्र मतदान १४६ होतंय. त्यापैकी काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळमकर राणेंना मतदान करतील. अशा वेळी वेगळा उमेदवार देऊन मतदानात निर्णायक भूमिका असणाऱ्या शिवसेनेचं मन वळवण्यासाठी भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेलेत. अर्थात या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेशी मतभेद वाढू नयेत, यासाठी ऐनवेळी राणेंऐवजी दुसराच उमेदवार मैदानात उतरवू शकते, जेणेकरून ही जागाही युतीकडेच राहिल, अर्थात भाजपच्या या प्रस्तावाला शिवसेना नेमका कसा प्रतिसाद देतेय, अजून समजू शकलेलं नाही.
First published: