सगळं चांगलं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील

राज्याचे मुख्यमंत्रीही संवेदनशीलतेने काम करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2018 12:09 PM IST

सगळं चांगलं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - संदीप राजगोळकर


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये एखादा माणूस पदावर बसला की लगेच त्याच्या खुर्चीला सुरुंग लावला जातो मात्र आरएसएस पासून प्रेरणा घेणाऱ्या आमच्या भाजपमध्ये तसं काही होत नाही अशी घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये न्युज 18 लोकमतशी बोलताना केली. राज्याचे मुख्यमंत्रीही संवेदनशीलतेने काम करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही असं स्पष्टीकरणही पाटील यांनी यावेळी दिलं. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला.


गेल्या 4 वर्षात आम्ही एकही निवडणूक हरलो नाही. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे, त्यामुळे आमचा प्रभावही संपलेला नाही. उलट विरोधक एकत्र आले की त्यांची ताकद वाढते म्हणूनच आम्ही शिवसेनेला आमच्यासोबत येण्याचं आवाहन करत आहोत, असं ते म्हणाले. सगळ्याच पक्षांनी हवं असल्यास वेगवेगळं लढावं. त्यानंतर प्रत्येक पक्षाला आपापली ताकद समजेल, असंही ते म्हणाले. मात्र यातही भाजप अग्रणी असेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Loading...


एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, 'ते आमच्यावर का टीका करत आहेत हे त्यांनाच माहीत, सगळं चांगलं चाललेलं असताना त्यांना वेगळं का वाटतं हे त्यांनाच माहीत,' असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. तर दुसरीकडे खोटे बोल पण रेटून बोल हा तर राजू शेट्टींचा स्वभावच असून, कोल्हापुरात राजू शेट्टी हे लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. माझी लोकसभा जिंकण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करणारच असंही ते पुढे म्हणाले.


राजू शेट्टी यांच्यात हिंम्मत असेल तर त्यांनी गाडी अडवायची नाही, फक्त आवाहन करायचं मग बघू त्यांचं आंदोलन कसं चालतं, असं म्हणत तुमची दंडुकेशाही आणि दादागिरी बंद करा असा सज्जड दमही चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना भरलाय. दरम्यान राज्यातल्या सगळ्याच साखर कारखान्यांनी FRP दिलीच पाहिजे असं सांगत त्याबाबत अडचण असेल तर मदत करू असे आश्वासनही पाटील यांनी दिले आहे. दरम्यान कर्नाटक निवडणुकीबाबत बोलताना पाचपैकी तीन जागा विरोधकांच्या होत्या मात्र दोन जागा हरल्या हे चिंताजनक असल्याची कबुलीही त्यांनी दिलीय.


VIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...